घरदेश-विदेशचीनला शह देण्यासाठी अमेरिकेच्या गुड बुकमध्ये  जिओचा समावेश 

चीनला शह देण्यासाठी अमेरिकेच्या गुड बुकमध्ये  जिओचा समावेश 

Subscribe

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी कौतुक केले. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मालकीच्या रिलायन्स जिओला 'क्लीन टेल्को' म्हटले आहे. रिलायन्स जिओ हे जगातील एकमेव असे नेटवर्क आहे जे एकाही चिनी उपकरणांचा वापर करत नाही असा दावा रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केला आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी कौतुक केले. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मालकीच्या रिलायन्स जिओला ‘क्लीन टेल्को’ म्हटले आहे. रिलायन्स जिओ हे जगातील एकमेव असे नेटवर्क आहे जे एकाही चिनी उपकरणांचा वापर करत नाही असा दावा रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी असा दावा केला आहे की जगातील नामांकित दूरसंचार कंपन्या आता चिनी कंपनी हुआवेईबरोबर व्यवसाय करण्यास नकार देत आहेत. पोम्पीओ म्हणाले की आता चीनच्या तंत्रज्ञान कंपनीच्या विरोधात वातावरण वळत आहे. क्लिन-अप व्यवसाय सुरू करणार्‍या कंपन्यांमध्ये स्पेनच्या टेलिफ्निका तसेच ऑरेंज, ओ 2, जिओ, बेल कॅनडा, टेलस आणि रॉजर्स या जगातील आघाडीच्या दूरसंचार ऑपरेटर पुढे जात आहेत. जगातील लोक चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पायाभूत सुविधांपासून दूर जात आहेत. या कंपन्या आता हुवेईसारख्या कंपन्यांशी व्यवसाय करण्यास नकार देत आहेत.

मोबाईल, नेटवर्कसह दूरसंचार क्षेत्रातील चीनची मक्तेदारी मोडणार 

जगभरातील टेलिकॉम ऑपरेटरबरोबर हुआवेचा करार संपुष्टात येत आहेत, कारण या देशांना त्यांच्या ५ जी नेटवर्कसाठी केवळ विश्वासू विक्रेत्यांच्या सेवा हव्या आहेत. पोलंड, स्वीडन, एस्टोनिया, रोमानिया, लाटविया आणि डेन्मार्क यासारख्या देशांनी याचा अवलंब केला आहे. अलीकडे ग्रीसने ५ जी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी हुवेईऐवजी एरिकसन वापरण्यास सहमती दर्शविली आहे. जगातील आघाडीचे दूरसंचार पुरवठादार आणि दुसऱ्या क्रमांकाचा फोन उत्पादक हुआवे या  चीन सरकारच्या वितरणाशी निकटचे संबंध असल्याबद्दल अमेरिकन अधिकाऱ्यांकडून याची कसून तपासणी केली जात आहे. अमेरिकेने आपल्या कंपन्या आणि त्याच्या भागीदारांना हुआवेबरोबर काम करण्यास बंदी घातली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -