घरदेश-विदेशगुगलवर देशाचे नकाशे यावेत म्हणून 'त्याने' खर्च केले ५ हजार डॉलर्स

गुगलवर देशाचे नकाशे यावेत म्हणून ‘त्याने’ खर्च केले ५ हजार डॉलर्स

Subscribe

देशासाठी स्वताच्या खिशातील पाच हजार डॉलर्स खर्च करून तवांडा कानहेमा या तरुणाने देशातील माहितीवर आधारित डॉक्यूमेन्ट्री बनवली आहे. देशात सर्व ठिकाणी फिरुन माहिती गोळा करुन ही डॉक्यूमेन्ट्री बनवण्यात आली.

देशाबद्दल प्रेम किंवा आदर हा प्रत्येकाच्या मनात असतो. मात्र हा आदर फक्त त्या व्यक्तिपुरताच सिमीत असताना अनेकदा दिसून आले आहे. देशाच्या विकासासाठी झिंबाब्वे मधील एका तरुणाने चक्क स्वतःच्या खिशातील पैसे खर्च केले आहेत. गुगलवर झिंबाब्वे देशाबद्दल माहिती नसल्यामुळे त्याने शहराच्या रस्त्यांची, प्रेक्षणीय स्थळांची, जंगलाची आणि इतर भौगोलिक गोष्टींच्या माहितीवर आधारित व्हिडिओ बनवला आहे. तवांडा कानहेमा (३७) या तरुणाचे नाव आहे. लहानपणापासून तो झिंबाब्वेमध्येच राहिला आहे. युनायटेड स्टेट्समधून पत्रकारिता आणि डॉक्यूमेन्ट्री फिल्म निर्माण करण्याचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर तो आपल्या देशात परतला होता. गुगलवर आपल्या देशाची माहिती उपलब्ध नसल्यामुळे लोक येथे भेट देत नाहीत असे त्याला वाटायचे. यासाठीच त्याने एक विशेष डॉक्यूमेन्ट्री बनवली.

- Advertisement -

खांद्यावर कॅमेरा घेऊन फिरला ५०० मैल

 तवांडा कानहेमा हा देशात परतल्यानंतर त्याने रस्ते नकाशे बनवण्याचे ठरवले. आपल्या खांद्यावर विशेष कॅमेरा घेऊन त्याने रस्त्यांनी आणि विमानांने प्रवास केला. देशाती प्रत्येक ठिकाणची पुरेपुर माहिती देणारा हा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याने ५०० मैलांचा प्रवास केला. हा प्रावस ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात करण्यात आला. या प्रवासादरम्यान आपला देश राहण्यास किंवा पर्यटकांसाठी उत्तम असल्याचे त्याने सांगितले आहे. 

 

View this post on Instagram

 

That’s a wrap! Peering into the Devil’s Cataract | Victoria Falls ? @caseycurry #GoogleStreetView

A post shared by KanhemaPhoto (@kanhemaphoto) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -