घरसंपादकीयओपेडप्रेम, आकर्षण आणि लैंगिक संबंध यात मोठा फरक!

प्रेम, आकर्षण आणि लैंगिक संबंध यात मोठा फरक!

Subscribe

आजच्या आधुनिक युगात प्रेम म्हटलं की फक्त प्रियकर-प्रेयसी हेच नातं अधोरेखित समजून,तेच त्रिवार सत्य मानलं जातं.आत्ता तर उघड उघड बॉय फ्रेंड,गर्ल फ्रेंड या नावाने हे नातं अधिक गडद होत आहे. त्यांच्या या नात्यात प्रेम की मैत्री? हेही कळत नाही. आज एक उद्या नवीन वेगळा जोडीदार अशी नवी पीढी. तारुण्यातील प्रेम हे आज सर्वात आकर्षणासाठी ठरले आहे. इतर प्रेम मागे पडले आहे. नवरा बायकोचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी लग्नापूर्वीच्या प्रेमाची आपुलकी, आदर आणि कदर एखाद्या अपत्यानंतर उरत नाही. वैद्यकीय, लैंगिकतज्ञ यांच्या म्हणण्यानुसार प्रेम,आकर्षण आणि लैंगिक संबंध यात मोठा फरक असतो.

प्रेमाला उपमा नाही. प्रेम ही निसर्गदत्त देणगी आहे. प्रेम एक संवेदना आहे. वैर जिंकावे प्रेमाने, वैराने वाढते वैर. द्वेशाने, द्वेश राग, सुडबुद्धी वाढते. प्रेमाने सारे जग जिंकता येते. प्रेम या दोन शब्दांमध्ये इतकी ताकद आहे त्यासाठी लोक आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्यार्‍यांचा इतिहास भयानक आहे. प्रेमाने भारावलेली, झपाटलेली माणसं धेय्यवेडी आसतात. ते आपलं इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही साधनांचा वापर करतात. अर्थात प्रेमाचे प्रकार वेगवेगळे आसतात. राष्ट्रीयप्रेम, देशप्रेम, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भावनिक, स्वार्थी -निस्वार्थी असे अनेक प्रकारचे प्रेम व्यापक अर्थाचे. भाऊ, बहीण, आई, वडील, पती, पत्नी हे रक्ताच्या नात्यातील प्रेम. पशु पक्षी प्राणी निसर्ग, यांवरील प्रेम थोडं कमीच. प्रेमाने आनंदाने जगता येत असलं तरी कित्येकांचा बळी घेतला आहे. बेधुंद प्रेमाची नशा काही वेगळीच असते. प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांची एक प्रसिध्द कव्वाली आहे. ‘प्रेमासाठी आईने पोराला मारलं’. प्रेम हे आंधळ असतं, त्यामुळे समोरच्याला काहीच दिसत नाही, म्हणून आंधळ्या प्रेमात कित्येकांचे बळी घेतले जातात.

किंबहुना प्रेमाच्या थरारक,जीवघेण्या कथा कायमस्वरूपी टिकून आहेत,राहतात. प्रेमकथा लोक तल्लीन होऊन आनंदाने आस्वाद घेत आवर्जून वाचतात. चित्रपटसृष्टीत बहुसंख्य चित्रपट प्रेमावर आधारित खूप कमाई करून गेले आहेत. ते लोकांच्या स्मृतीपटलावर कायम आहेत. चित्रपटात घडणार्‍या गोष्टींचा दुष्परिणाम झालाआहे. काल्पनिक कथांचा अनुकरण केल्याने अनेक प्रेमी युगुलांनी करून आपल्या जीवनाचा अंतही केला आहे. प्रेमात ताकद असली, प्रेम ही निश्चितच पवित्र भावना असली, तरी नकळत अनेक चुकाही प्रेमवीरांच्या हातून घडल्या आहेत. एकतर्फी प्रेमातून हत्त्या झाल्या आहेत. प्रेम कुणावरही करावं आई-वडील, मुलं, बहीण-भावंड, नातेवाईक पती पत्नीवर. प्रेम म्हणजे प्रेम असतं, परंतु ते सर्वांचच सारखं नसतं. प्रेमात गरीबी आणि श्रीमंती असाही भेदभाव केला जातो,आधी श्रीमंती हा नुसता दिखावा हे उशिरा कळल्याने त्याचे दुष्परिणाम झालेले आपण पाहिले आहेत.

- Advertisement -

आजच्या आधुनिक युगात प्रेम म्हटलं की फक्त प्रियकर-प्रेयसी हेच नातं अधोरेखित समजून,तेच त्रिवार सत्य मानलं जातं.आत्ता तर उघड उघड बॉय फ्रेंड,गर्ल फ्रेंड या नावाने हे नातं अधिक गडद होत आहे.त्यांच्या या नात्यात प्रेम की मैत्री? हेही कळत नाही. आज एक उद्या नवीन वेगळा जोडीदार अशी नवी पीढी. तारुण्यातील प्रेम हे आज सर्वात आकर्षणासाठी ठरले आहे. इतर प्रेम मागे पडले आहे. नवरा बायकोचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी लग्नापूर्वीच्या प्रेमाची आपुलकी, आदर आणि कदर एखाद्या अपत्यानंतर उरत नाही. वैद्यकीय, लैंगिकतज्ञ यांच्या म्हणण्यानुसार प्रेम,आकर्षण आणि लैंगिक संबंध यात मोठा फरक असतो. प्रेमाला वय नसतं,हे जरी सत्य असलं तरी ते प्रेमच आहे की काय? किशोरवयापासून प्रौढावास्थेपर्यंत ते प्रेम असतं की आकर्षण? हाही संशोधनाचा महत्त्वाचा विषय आहे. प्रेमभंग झाल्यावर एखाद्याचं आयुष्यही उध्वस्त झालेले आपण पाहिले आहे. प्रेम कवितांचा हाच काळ हेच वय असतं.

ओठांतून आंतरिक शब्द फुटतात आणि कवितेचा जन्म होतो. उत्कट भावनांना कवितेतून वाट मोकळी केली जाते. आपण असे अनेक प्रेमकवी पाहिलेत त्यांनी फक्त प्रेम कविताच केल्या, प्रेमभंग झाल्यावर त्यांच्यातलं कविमन मृत होतं. प्रेमात जिंकले कवितेत मात्र हरले,असेही महाभाग आहेत! कवी नवनाथ रणखांबे कविता करता करता प्रेमकवितेतून समतेसाठी उठावाची मांडणी करू लागले. उठाव हा क्रांतिकारी शब्द आहे. जेव्हा अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होते तेव्हा उठाव म्हणजे उद्रेक होतो. ‘प्रेम उठाव’ हा कवी नवनाथ रणखांबे यांचा अलीकडे प्रकाशित झालेला काव्यसंग्रह. रणखांबे यांच्या स्वतःच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर त्यांचा स्वतःचाच प्रेम विवाह आहे आणि त्यातून त्यांना या प्रेमाचा बहर आलेला, फुललेला दिसतो. स्वत: अनुभवल्याने त्याची अविट गोडी त्यांनी प्रेम उठाव या काव्यसंग्रहातून व्यक्त केली आहे.

- Advertisement -

असं म्हणतात ‘प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं’. खरंच माफ असतं का? कवी रणखांबे प्रेमाचा जागर घालतो आहे. त्याच्या सर्व प्रेम कविता एकत्रित करून प्रेमाचा उद्रेक, ज्वालामुखी या अर्थाने त्याने प्रेम उठाव असं म्हटलं असावं. प्रेम उठाव या कवितासंग्रहात बहुसंख्य प्रेम कविता आहेत. प्रेमाचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा आहे, कुणाला चटके लागले असतील, कोणी प्रेमातून होरपळून निघाला असेल, कोणाला सुखद अनुभव आला असेल किंवा कोणी प्रेमासाठी जिवाचा अंत केला असेल. प्रेमाच्या अंतरंगात जगणार्‍या कवीच्या कविता असेही या कविता संग्रहाचे वर्णन करता येईल. प्रेमाच्या परिघाबाहेर दुसरंही जग आहे ते या कवीला दिसत नसावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम हे निस्वार्थी असावं, कुठल्याही प्रकारचं प्रेम असलं तरी आपला त्यात कोणताही स्वार्थ नसावा, तरच ते प्रेम खर्‍या अर्थाने टिकून राहतं शेवटच्या क्षणापर्यंत.

या संग्रहातील ‘खास’ नावाची कविता. या कवितेत ते लिहतात….

प्रत्येकाच्या आयुष्यात
प्रेम होत असतं
प्रत्येकाच्या तारुण्यात
कोणीतरी खास असत.

कवीने या कवितेत प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम होत असतं म्हटलं आहे. प्रत्येक प्रियकर प्रेयसी प्रेम करतात ते खासच असतं. ते खास असतं म्हणून तडफड,तळमळ वेगळी असते त्यासाठी कसलाही त्याग करण्याची,जोखीम घेण्याची तयारी असते. प्रिय व्यक्ती भेटावी म्हणून अनेक बहाणे करून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. कुमारावस्थेत हा प्रभाव जास्त प्रमाणात असतो. त्यातून प्रेम भावना वृद्धिंगत होत असते,शिवाय प्रेमालाही बहर येतो. प्रत्येकाला प्रेम करण्याची संधी मिळत असली तरी, प्रत्येक जण प्रेम करतोच असंही नाही.

कारण त्याच्या सभोवताली परिस्थिती आणि पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांची सुरू असलेली धडपड त्यामुळे बर्‍याच जणांना त्या अवस्थेतून जात असतानासुद्धा, प्रेमाची उत्कट भावना जागृत होऊन त्यावर पाणी सोडावं लागलेलं आहे. कारण प्रेमापेक्षा पोटाची खळगी भरणं आवश्यक असतं. प्रत्येकाच्या प्रेमाचे स्वरूप आणि व्याप्ती मात्र वेगळी असते. ‘राहिली हृदयात’ या कवितेत रणखांबे आपल्या सगळ्या भावनांना वाट मोकळी करतो. जिच्यासाठी आयुष्यातील सगळी सुखदुःख पार करून ती मिळावी यासाठी आकांताने सगळे प्रयत्न केले. रोज यातना सहन केल्या अश्रु वाहिले, ती जेव्हा सोडून गेलेली असते तेव्हा तिच्या वेदना तो कायम उराशी बाळगून जगत असतो. कवी म्हणतो…

जोडले होते हात तिने माझ्या मनाला
ती तरीही राहिली हृदयात होती

काही गोष्टी ह्या आपण विसरूच शकत नाही. कवी म्हणतो, की तिने मला हात जोडले होते, विसरून जा असं बजावून, विनवनी करूनही ती हृदयात माझ्या कायम घर करून आहे. अनेकांच्या बाबतीत आपण जेव्हा अनुभवतो पाहतो तेव्हा लक्षात येतं की लोक काही घटना विसरू शकत नाहीत. यावरून हेच स्पष्ट होत असतं की ‘गत काळात घडलेल्या घटना विसरता येत असल्या, तरी त्या कायमच्या पुसून टाकता येत नाहीत’. ज्या कुणालाही सांगता येत नाहीत. त्या सुखद वेदना आयुष्यभर ‘आपल्या सोबत सरणावरती मरणासोबत’ घेऊन जायच्या. प्रेमाच्या नात्यातून होरपळून गेलेल्यांच्या जखमा कायम ओल्या असतात. ते बोलू शकत नाहीत, ते व्यक्त करू शकत नाहीत. त्या खोलवर रुजलेल्या असतात त्यामुळे कवीच्या स्वानुभवातील कविता वाचताना वाचकाला आपल्याच आयुष्यातील या कविता असाव्यात असं वाटतं. पुढे कवी रणखांबे लिहतात…

हृदयाने माझ्या खूप साठवले
लेखणीला मात्र थोडेच आठवले

या थोड्यामध्ये सारे विश्व व्यापलेले आहे. हृदयाच्या कप्प्यात काही नावं काही आठवणी साठवलेल्या असतात,कोरलेल्या असतात. पण कालांतराने सर्वच आठवत नाहीत. हेही एका अर्थाने बरंच आहे. नाहीतर पुन्हा हृदयात आणि मेंदूत गोंधळ व्हायचा,स्मृती-विस्मृतीत आणखी काही वेगळं व्हायचं. जे लोक हळवे असतात ते सहजासहजी सगळं विसरून जात नाही. काही सगळेच साठवतात. काही मात्र सगळे विसरतात. आठवणी या आठवणी असतात, त्या काढून रडणारे लोक आहेत. आठवणींच्या हिंदोळ्यात रमताना पूर्वानूभव ध्यानात ठेवून, वर्तमान जगताना भविष्यात प्रसंग उद्भवणार नाहीत, याचं नियोजन केल्यास प्रश्न राहणार नाहीत. ‘अस्वस्थ’ या कवितेत कवी म्हणतो ‘उद्या मी असेन किंवा नसेन’ पण कवितेच्या रूपाने मी तुमच्या हृदयात वसेन. माणसाचं आयुष्य क्षणभंगुर आहे, कधी कुणावर काय प्रसंग येऊन, कुठे काय होईल हे कुणालाही माहीत नाही. त्याच्यामुळे मी जरी नसलो तरी कवितेच्या रूपाने मी तुमच्या हृदयात राहीन. असा विशेष संदेश या कवितेतून देतात.
या कवितासंग्रहाला ‘प्रेम उठाव’ हे नाव का दिलं असावं हे ‘उठाव’ कवितेतून स्पष्ट होतं. समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण व्हावी. समतेचे वादळ यावं आणि विषमता जळून खाक व्हावी. यासाठी धडपडणारे कार्यकर्ते समाजसेवक झटतात. त्यांची स्वप्ने सत्यात यायला हवीत. रणखांबे हा कवी समतेचा उठाव मांडतो. उठाव हा शब्द काव्यसंग्रहाला न्याय देणार आहे असं कविता वाचल्यावर कळतं.कवी म्हणतो …

समतेचा हा उठाव आहे
इथल्या खेड्यापाड्यातल्या गाव तांड्यातला
ईथल्या सृष्टीमधल्या चराचरामधला
आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विषम भेदभावनांचा, माणुसकीला काळिमा फासणार्‍या कुप्रथांचा!!

प्रकाशदात्या माणसांच्या अंधाराला संपून टाक सृष्टीमध्ये चराचरात समतेचे तत्व आण. इडा पिडा जाऊ दे समतेचे युग येऊ दे! समतेचा उठाव अन्यायाविरुद्ध आहे, ती खर्‍या अर्थाने विषमतेविरुद्ध चीड आहे. बंड, क्रांती ही समतेसाठी आहे आणि म्हणून ही कविता फार महत्त्वाची आहे. समतेचं राज्य यावं यासाठी भारतातील नव्हे तर जगातील अनेक महापुरुषांनी आपल्या देहाची बाजी लावली आहे. अलीकडच्या काळात अनेक समाजसेवक, प्रज्ञावंत, विचारवंतांनी समतेसाठी समाजस्वास्थ्य, समाजशांतीच्या आग्रहामुळे या जगाचा निरोप घेतलेला आहे. सनातनी विचारसरणीने पुरोगाम्यांचा जीव घेतला आहे. समतेची लाट येऊन विषमता वाहुन गेली पाहिजे, झडून गेली पाहिजेत विषारी मतप्रणाली.

या संग्रहात कविता, गझल, चारोळ्या अतिशय छोट्या छोट्या आहेत, परंतु त्यातील संदेश त्यातील विचार प्रवाह अतिशय मोठा आहे. थेंब कवितेत कवी लिहतो…

दुःखाचा समुद्र
डोळ्यात दाटल्यावर
टपटपतात टपोरे थेंब
कविता होऊन कागदावर.

एक आंतरिक वेदना या कवितेतून कवीने मांडली आहे. कारण तुझ्याशिवाय जगणं नाही.
तुझ्याशिवाय जगणं हे भकास आहे कारण तू भेटल्यावर एकांतात पाऊस मी बघायचा, तू आल्यावर मिठीत पाऊसही पडायचा. प्रेयसीची आठवण आली की अश्रु दाटतात, ते कविता होऊन कागदावर उमटतात.
या कविता संग्रहात आहेत एकूण ४० कविता आहेत. सर्वच कविता आशय संपन्न असल्याने समृद्ध असा कवितासंग्रह आहे. ‘प्रेम उठाव’ हे नाव आकर्षित करणार असून मुखपृष्ठ प्रेमात पडणारं आहे. प्रेम आणि उठाव या दोन वेगवेगळ्या बाजू एकत्रित गुंफून त्या कवितेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात कवी यशस्वी झाला आहे.

— प्रदीप जाधव.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -