घरमनोरंजनKartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यनने खरेदी केली कोट्यवधीची नवी कार

Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यनने खरेदी केली कोट्यवधीची नवी कार

Subscribe

भुल भुलैय्या 3 या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. कार्तिक आर्यन अनेकदा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. आता यावेळी तो त्याच्या नव्या गाडीमुळे चर्चेत आला आहे. कार्तिकचे महागड्या गाड्यांवरील प्रेम सर्वांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या मुलाखतीत तो त्याच्या गाड्यांच्या आवडीबद्दल बोलत असतो. आता त्याच्या महागड्या गाड्यांच्या संग्रहात आणखी एका नव्या कोऱ्या गाडीचा समावेश झाला आहे.  नुकतीच कार्तिकने नवी कार खदेरी केल्याची माहिती समोर आली आहे.

रेंज रोव्हर Range Rover SV कार

कार्तिककडे काही लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. आता या कलेक्शनमध्ये त्याने आणखी एक गाडी आली आहे. कार्तिकने नवी एसयूवी कार खरेदी केली आहे. या कार सोबतचा फोटो त्याने सोशल मीडियावरव शेअर केला आहे. कार्तिकनं नवी कार घरी आणल्यानंतर त्याची पूजा केली. कारसमोर नारळ फोडला. नवी कार घरी आणल्यानंतर कार्तिकनं त्याच्या लाडक्या कटोरीबरोबर फोटो काढले. कटोरी म्हणजेच कार्तिकचा लाडका कुत्रा.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

- Advertisement -

 “हमारी रेंज थोड़ी सी बढ़ गई है।”असं कॅप्शन देत कार्तिकनं त्याच्या नव्या कारचा फोटो शेअर केला. त्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. चाहत्यांनी कमेंट करत‘ग्रेट चॉइस चंदू’असं म्हटलं आहे. तर काहींनी “कार चावलायला आणलीस की डिक्कीत झोपायला”,असंही त्याला विचारलं.

कारची किंमत किती?

कार्तिकच्या रेंज रोव्हर एसयूव्हीचा रंग बॉटल ग्रीन आहे. या लक्झरी कारची बाजारातील किंमत 4.94  कोटी ते 6 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. BMW 5 Series 520d, McLaren GT, Mini Cooper S, Lamborghini Urus Capsule आणि Porsche 718 Boxster यासह अनेक कारचे कलेक्शन केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकनं रेंज रोवर SUV बॉटल ग्रीन रंगाची कार खरेदी केली आहे. या कारची मार्केट वॅल्यू ही 4.94 कोटी ते 6 कोटींपर्यंत आहे. कार्तिकची ही कार नसून कार्तिकच्या गॅरेजमध्ये आधीपासून 3 महागड्या कार आहेत. ज्यात लॅबोर्गिनी, मॅकलेरन आणि पोर्श सारख्या महागड्या कार आहेत. कारचा टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रति तास आहे. 4.7 सेकंदात ही कार 1-100 किलोमीटर स्पीड पकडते.

कार्तिकचा सध्या भुल भुलैया 3 हा सिनेमा येत्या काही महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. सध्या त्याच्या सिनेमाचं शुटींग सुरू असून त्यामध्ये तृप्ती डिमरी देखील दिसणार आहे. शिवया कार्तिक एका चंदू चॅम्पियन चित्रपटामध्ये देखील दिसणार आहेत. तसेच आशिकी 3 या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -