घरमनोरंजनअक्षय, अजय आणि शाहरुखची नवी जाहिरात पाहून युझर्स संतप्त

अक्षय, अजय आणि शाहरुखची नवी जाहिरात पाहून युझर्स संतप्त

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो. अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे तसेच जाहिरातींमुळे त्याला नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागतो. अशातच, आता पुन्हा एकदा युझर्स अक्षय कुमारला ट्रोल करत आहेत. यामागचे कारण म्हणजे नुकतीच अक्षय कुमारने पुन्हा एकदा अभिनेता शाहरुख आणि अजय देवगणसोबत पान मसाल्याची जाहिरात केली आहे.

अक्षय, अजय आणि शाहरुख पुन्हा वादाच्या कचाट्यात

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@srkking555)

- Advertisement -

अभिनेता अजय देवगण मागील अनेक वर्षांपासून एका पॉप्युलर पान मसाल्याच्या ब्रँडची जाहिरात करत आहे. काही महिन्यांपूर्वी या जाहिरातीत शाहरुख आणि अक्षय कुमारची देखील एन्ट्री झाली होती. त्यावेळी देखील या जाहिरातीवर अनेकांनी या तिन्हा बॉलिवूड कलाकारांना ट्रोल केलं होतं. त्यावेळी अक्षयने ट्वीट करुन माफी देखील मागितली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा एकदा अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुखची याचं ब्रँडची नवीन जाहिरात समोर आली आहे या जाहिरातीमध्ये या तिघांसोबत बिग बॉस 16 फेम अभिनेत्री सौंदर्या शर्मा देखील दिसत आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

नवी जाहिरात पाहून युझर्स संतापले

काही महिन्यांपूर्वी याचं ब्रँडची जाहिरात पाहून नेटकऱ्यांनी या तिन्ही कलाकारांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. त्यावेळी अक्षय म्हणाला होता की, “आयुष्यात मी अनेक चूका केल्या त्यातील एक मोठी चूक म्हणजे पान मसाल्याची जाहिरात. त्या चूकीचा मला खूप पश्चाताप झाला. मी त्या चूकीचा स्वीकार केला. प्रत्येक व्यक्ती चूकीमधून काहीतरी शिकतो. मी देखील शिकलो.” परंतु आता पुन्हा एकदा तिच चूक अक्षय कुमारने केल्याने युझर्स प्रचंड संतप्त झाले आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा : नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या ‘गडकरी’चा टिझर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -