घरमनोरंजनबिजेंद्र पाल सिंग FTIIचे नवे अध्यक्ष

बिजेंद्र पाल सिंग FTIIचे नवे अध्यक्ष

Subscribe

ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बिजेंद्र पाल सिंग यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याअगोदर अनुपम खेर अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. परंतु, त्यांनी राजीनामा दिल्यापासून अध्यक्षपद रिकामे होते.

टीव्ही मालिकेचे निर्माते दिग्दर्शक बिजेंद्र पाल सिंग यांची एफटीटीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुढे आणली आहे. बिजेंद्र पाल सिंग हे आता एफटीटीआयचे नवे अध्यक्ष असतील अशी पत्रकच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे. सिनेमॅटोग्राफी हा सिंग यांचा मुख्य विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या टीव्ही आणि मनोरंजन जगतात कार्यरत आहेत. सीआयडी या त्यांच्या मालिकेला नुकतीच २१ वर्षे पूर्ण झाली. सीआयडी या मालिकेने लोकांच्या मनावर गारूड केले. अभिनेते अनुपम खेर यांच्या जागी सिंग यांची निवड करण्यात आली आहे. याआधी सिंग यांच्याकडे एफटीटीआयचे उपाध्यक्ष पद होते. सिंग यांना इथल्या प्रश्नांची पूर्ण जाणीव आहे. ते आता अध्यक्ष म्हणून अधिक चांगले काम करतील अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

याअगोदर अनुपम खेर होते अध्यक्ष

अभिनेते अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन ऑफ इंडिया) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपद रिकामे होते. या अध्यपदावर आता ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक बिजेंद्र पाल सिंग यांची निवड करण्यात आली आहे. या पदासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय काही दिवसांपूर्वी अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची निवड करणार असल्याची चर्चा होती. त्याअगोदर शत्रूघ्न सिन्हा यांना अध्यक्षपदासाठी विचारण्यात आले होते. मात्र त्यांनी नकार दिला होता.

- Advertisement -

हेही वाचा – FTIIच्या अध्यक्षपदी नसरूद्दीन शहा?

अनुपम खेर यांनी ३१ ऑक्टोबरला एफटीआयआयच्यापदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी वर्षभर अध्यक्षपद सांभाळले होते. परंतु, चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे वेळ मिळत नसल्याचे कारण सांगत त्यांनी राजीनाम दिला. खेर यांच्यापूर्वी गजेंद्र चौहान यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. पण, विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यानंतर अनुपम खेर यांच्याकडे एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पण, त्यावेळी देखील भाजपच्या जवळच्या व्यक्तीकडे अध्यक्षपद दिले जात असल्याची नाराजी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली होती.

- Advertisement -

हेही वाचा – अनुपम खेर यांचा FTII ला रामराम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -