घरमनोरंजनपराग करतोय पुष्करच्या 'गेम प्लॅन'ची कॉपी

पराग करतोय पुष्करच्या ‘गेम प्लॅन’ची कॉपी

Subscribe

पराग कान्हेरे हा बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी बिग बॉस १ चा स्पर्धक पुष्कर जोगची कॉपी करताना दिसतो.

बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांचा पहिला आठवडा तर छान गेला आणि या आठवड्यात एलिमिनेशन नसल्याने सगळे खूश होते. वीकेंड ‘अनसीन अनदेखा’च्या वूटवरील क्लिपमध्ये काही निराळेच समोर आले आहे. त्या-त्या दिवसाचा गेमप्लान ठरवण्यासाठी दररोज एक तास द्यावा अशी चर्चा करताना पराग, किशोरी आणि रूपाली दिसत आहेत आणि वीणाही त्यांच्यात सामील झाली आहे.

- Advertisement -

या चर्चेत पराग स्वत:ची तुलना पहिल्या सीझनमधील पुष्कर जोगशी करतोय आणि म्हणतोय, “पुष्कर तीन मुलींबरोबर होता. तो नेहमी त्यांच्यातच असायचा. पण माझा स्वभाव तसा नाही आहे. मी बाकीच्या मुलांसोबतही असतो आणि त्यांच्याशी गप्पांचं ट्युनिंग आहे.” तो पुढे म्हणतो, “अशा कुठल्याही व्यक्तीने तुमच्याकडे येऊन सांगितलं ना की, मी तुमच्याबद्दल असं म्हणालो वगैरे, मी आईची शप्पथ घेऊन सांगतो मी नाही बोलणार हे.”

रूपाली सहमती दर्शवत म्हणते, “आपण कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी एकमेकांना विचारू. त्यासाठीच अर्धा तास काढूया आपण.” पण किशोरी गोंधळलेली वाटतेय आणि बाकीच्या तिघांना (पराग, वीणा आणि रूपाली) ती म्हणते की, तिला या निरीक्षणांबद्दल सांगत राहा. ती म्हणते, “कारण माझ्या मागे जे घडतं ना, ते ऑब्झर्व करायची सवय नाहीये. आजपर्यंत अशी जगले की तोंडावर घडतंय, त्याचं उत्तर द्यायचं आणि संपवायचा विषय. पण इथे असं आहे ना की, कारस्थानं जास्त चालतात.”

- Advertisement -

तर दुसरीकडे शिवानी, बिचुकले यांच्यामध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळणार आहे. अभिजीत बिचुकले त्यांच्या बोलण्यातून कधी कधी गोष्टीत गंमत आणण्याचा प्रयत्न करतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आज अशीच एक गंमतीशीर गोष्ट किचनमध्ये घडणार आहे. रुपाली भोसले किचनमध्ये जेवण बनवताना कुकर मध्ये पाणी जास्त झाले आणि ते बाहेर येऊ लागले, यालाच अभिजित बिचुकले यांनी स्वत:शी जोडले कि कुकरला माझे बोलण सहन झाल नाही तर तुला कस होईल त्यावर शिवने देखील अभिजित बिचुकले यांवर एक टोंबणा मारला कि, “तुमच्या बोलण्यावर धिंगाणा झाला तर जिथे तुम्ही बोलता काय ना काय होतं” त्यावर बिचुकले यांनी देखील शिवला उत्तर देताना म्हंटले
“प्रेशर कुकर असून देखील त्याला माझे प्रेशर सहन होत नाही तर माणसांना कसं होईल ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -