घरमनोरंजनOscar 2022 : विल स्मिथने कानाखाली लगावल्याप्रकरणी ख्रिस रॉकने सोडलं मौन; म्हणाला...

Oscar 2022 : विल स्मिथने कानाखाली लगावल्याप्रकरणी ख्रिस रॉकने सोडलं मौन; म्हणाला…

Subscribe

विनोदामधून त्याने स्मिथ याची पत्नी जेडाच्या आजारपणाची खिल्ली उडवल्याने चिडलेल्या स्मिथने थेट मंचावर जाऊन ख्रिसच्या कानाखाली लगावली

कोरोनानंतर मनोरंजन विश्व बदललं असून, त्यात अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. मनोरंजन विश्वातला सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार (Oscar Award 2022) सोहळ्यात भारतातील एकाही चित्रपटाला यंदाही मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरता आलेले नाही. संपूर्ण जगातील सिनेमासृष्टीला प्रतीक्षा असलेला ऑस्कर पुरस्कार सोहळा सोमवारी पार पडला होता. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारा ख्रिस रॉकला(Chris Rock) अभिनेता विल स्मिथने (Will Smith) कानाखाली मारली होती. यामुळे ऑस्कर सोहळ्याची सगळीकडे चर्चा रंगली होती. मात्र असा प्रकार या अगोदर कधीही झाला नव्हता, जे इतिहासात कधीही घडलं नव्हतं ते ह्या सोहळ्यात घडलं होतं.

ऑस्कर सोहळ्यात नेमकं काय घडलं?

- Advertisement -

विल स्मिथच्या पत्नीचे नाव जेडा पिंकट स्मिथ आहे. ती या सोहळ्यामध्ये विलसोबत प्रेक्षकांमध्ये बसली होती. सोमवारी ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन ख्रिस रॉक करत होता. यावेळी तो सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला आणि मंचावर आल्यावर त्याने एक विनोद केला. यावेळी ख्रिस जेडाला G. I. Iane 2मध्ये पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहे. त्याच दरम्यान विनोदामधून त्याने स्मिथ याची पत्नी जेडाच्या आजारपणाची खिल्ली उडवल्याने चिडलेल्या स्मिथने थेट मंचावर जाऊन ख्रिसच्या कानाखाली लगावली. काही वेळेसाठी सर्वांना हा स्टंट असेल, असे वाटले होते. मात्र हे खरोखर घडलं होतं. हे लक्षात येताचं सर्वांना धक्का बसला. मंचावरून खाली आल्यावर विल स्मिथने ख्रिसला ओरडून सांगितले की, तुझ्या तोंडून माझ्या पत्नीचे नाव घेऊ नको.

स्मिथच्या पत्नीला कोणता आजार झाला होता?

- Advertisement -

स्मिथची पत्नी जेडाला (Jeddah ) अलोपेसिया (alopecia) नावाचा आजार झाला असून, तिच्या डोक्यावरील केस गळत असतात. 2018 मध्ये तिने पहिल्यांदा भाष्य केलं होतं की, आंघोळ करताना केस मूठभर हातात येतात म्हणून मी केस छोटे करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगण्यासाठी खूप आव्हानांसाठी सामोरे जावे लागते, याबद्दलची माहिती तिने दिली.

ख्रिस रॉकची प्रतिक्रिया

ख्रिस हा बुधवारी रात्री बोस्टनमधील एका स्टँडअप (standup in Boston) या कार्यक्रमात उपस्थित राहिला होता. यावेळी त्याचे टाळ्याच्या कडकडाटात स्वागत केले. या उपस्थितीवेळी त्याने ऑस्कर सोहळ्यामध्ये विल स्मिथने कानाखाली मारल्याचा उल्लेख केला. ख्रिस प्रेक्षकांना सांगताना म्हणाला की, “जे काही झालं याबद्दल भाष्य करण्यासाठी माझ्याकडे सांगण्यासाठी काही नाही, जर तुम्ही त्याबद्दल ऐकण्यासाठी आला असाल तर माझ्याकडे एक पूर्ण शो आहे. तो मी वीकेंडच्या आधी लिहिला आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -