घरमनोरंजनपरदेशी वारीची पुढची गोष्ट

परदेशी वारीची पुढची गोष्ट

Subscribe

आता परदेशात जाऊन नाटकाचे प्रयोग करणे तसे कठीण राहिलेले नाही. पण २५-३० वर्षांपूर्वी एखाद्या नाटकाने परदेशी वारी केली की नकळत मुंबईतल्या प्रयोगावर त्याचा परिणाम होत होता. प्रेक्षकांची बर्‍यापैकी गर्दी जमत होती. मोहन वाघांनी अगदी नाटकाचा शुभारंभ करण्यापर्यंत अनेक गोष्टी परदेशातच केलेल्या आहेत. पुढे मालवणी सम्राट मच्छिंद्र कांबळी यांना मोह काही आवरता आला नाही. वस्त्रहरणचा प्रयोग लंडनमध्ये व्हावा असे त्यांना वाटत होते. पण खर्चाचा आवाका मोठा असल्यामुळे काय करायचे असा प्रश्न मनात आला आणि सेलिब्रिटी कलाकारांना घेऊन वस्त्रहरणचा प्रयोग करायचा आणि यातून मिळणार्‍या रकमेतून लंडन गाठायचे असे ठरले होते. नाना पाटेकर, भगवान पालव, विजू खोटे, डॉ. काशिनाथ घाणेकर हे सर्व कलाकार वस्त्रहरणच्या नाटकात सहभागी झाले होते. पुढे अमेरिकेला जाऊन प्रयोग करणे अशक्य नाही हे कोणत्या निर्मात्याने पटवून दिले असेल तर ते सुधीर भट या निर्मात्याने. त्यांची बरीचशी नाटके ही परदेशात झालेली आहेत. याचा सर्वाधिक जवळचा साक्षीदार कोण असेल तर प्रशांत दामले याचे नाव घ्यावे लागेल.

सुयोगच्यावतीने निर्मिती करण्यात आलेल्या बर्‍याचशा नाटकात प्रशांत हा होताच. त्यामुळे प्रयोगाचे आयोजन, त्यासाठी करावी लागणारी तयारी ही प्रशांतला बर्‍यापैकी माहिती होती. पुढे प्रशांतने स्वत:ची नाट्यसंस्था स्थापन केली आणि यातून त्याचेसुद्धा परदेशी जाणे वाढले. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे त्याच्या नव्या नाटकाचे नाव आहे. एकिकडे साखर खाल्लेला माणूस आणि दुसरीकडे स्वत:च्या नाटकाचे प्रयोग तो करत होता. आता तब्बल दीड महिना तरी मुंबईत नाटकाचे प्रयोग तो करणार नाही. त्याला कारण म्हणजे त्याचे हे नाटक परदेशी वारीला निघालेले आहे.

- Advertisement -

परदेशी वारीची पुढची गोष्ट म्हणजे मुंबईत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली बरीचशी नाटके प्रशांतने परदेशात सादर केलेली आहेत. मध्यंतरी त्याने निर्मिती केलेली काही नाटके सोडली तर सुरुवातीच्या प्रवासात कविता मेढेकर या अभिनेत्रीने त्याच्याबरोबर अनेक प्रयोग केलेले आहेत. यशस्वी जोडी म्हणूनही प्रेक्षकांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे. पुढे मालिकेतही ते दोघे एकत्र येतील असे बर्‍याचशा निर्मात्यांनी पाहिलेले आहे. झी मराठीने मराठी नाटकाचे प्रयोग होण्याच्यादृष्टिने ज्या नाट्य संस्थांना सहकार्याचा हात दिलेला आहे, त्यात एका लग्नाची पुढची गोष्ट हे एक नाटक आहे. खरंतर परदेशात तेही वेगवेगळ्या देशात प्रयोग करायचे म्हणजे पहिले सहा महिने आधी त्याचे नियोजन करावे लागते.

कलाकारांवरच वेगवेगळी जबाबदारी सोपवून तिथल्या प्रेक्षकांना नाटकाचा संपूर्ण आनंद कमी कलाकार संचात द्यावा लागतो. इतक्या लांबचा प्रवास करताना तिथल्या आयोजकांशी सतत संपर्क साधणे, त्याचा पाठपुरावा करणे हे आलेच. जी काही बोलणी होत होती, त्यात सेंट्रल लंडन येथे प्रयोग करण्याचे निश्चित झाले, पुढे यु के ची ही तारीख मिळाली आणि आता कॅनडामध्येही प्रयोग करण्याचे निश्चित झालेले आहे. आता दीड महिन्यांसाठी प्रशांत दामले आणि त्यांची टीम परदेशी प्रवासाला निघते आहे म्हटल्यानंतर त्याचे आणखीन प्रयोग होतील हे वेगळे सांगायला नको. अद्वैत दादरकर हा या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -