घरमनोरंजनआजारपण देखील बिग बींना थांबवू शकत नाही

आजारपण देखील बिग बींना थांबवू शकत नाही

Subscribe

आजारपणातून नुकत्याच बाहेर पडलेल्या बिग बींच्या नवीन चित्रपटाचे लूक रिवील.

७७ वर्षांच्या बिग बींची तब्येत मध्यंतरी ठिक नव्हती. ते ४ दिवस रुग्णालयात दाखल देखील होते. तरी त्यांचा आजारपण त्यांना त्यांच्या कामापासून लांब ठेवू शकत नाही. आजारातून बाहेर पडताच त्यांनी आपल्या नवीन चित्रपटासाठी काम सुरू केले. २०२० मध्ये आयुष्मान खुरानासह, चित्रपट निर्माता सुजित सरकरच्या, ‘गुलाबो सीताबो’ या चित्रपटात दिसणार आहेत. नुकत्याच या चित्रपटाचं दोघांचाही लुक रिव्हील करण्यात झाला आहे.

बाला या चित्रपटामध्ये अगदीच वेगळ्या लुकमध्ये दिसलेला आयुष्मान आता या चित्रपटात एका साध्या कुर्ता आणि पायजमात दिसत आहे तर बिग बी हिरव्या कुर्त्यात आणि वाढलेल्या दाढीत दिसत आहेत. हे दोघेही एखादी गोष्ट शोधत असल्यासारखे दिसत आहे.

- Advertisement -

मे महिन्याच्या रोजी आयुष्मान खुरानाने विकी डोनरचे दिग्दर्शक सुजित सरकरसह त्याचं दुसरं चित्रपट इंस्टाग्रामवर जाहीर केलं. यामध्ये आयुष्माननं हे देखील सांगितलं की या चित्रपटात, तो अमिताभ बच्चनसह पडद्यावर दिसणार आहे. सुजित सरकर आणि आयुष्मान, या दिग्दर्शक-अभिनेताच्या जोडीला विकी डोनर नंतर पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहण्यास लोकं फार उत्सुक आहेत. ‘गुलाबो सीताबो’ या चित्रपटात पहिल्यांदाच आयुष्मान आणि अमिताभ यांना एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोघांचे चाहते सध्या आनंदात आहेत.

- Advertisement -

२ फेब्रुवारी २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आधी हा चित्रपट नोव्हेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला. सुजित सरकर दिग्दर्शित, गुलाबी सीताबो, जूही चतुर्वेदी लिखित आणि रॉनी लाहिरी आणि शील कुमार निर्मित, एक राइझिंग सन फिल्म्स प्रोडक्शन आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -