घरमनोरंजनकेदारनाथ धाम यात्रेदरम्यान साराने बनवलं जेवण

केदारनाथ धाम यात्रेदरम्यान साराने बनवलं जेवण

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. सारा नेहमीच वेळात वेळ काढून अनेक ठिकाणी फिरताना दिसते. यावेळचे साराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी साराने केदारनाथ यात्रा केली ज्यादरम्यानचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साराने केली केदारनाथ धाम यात्रा

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराने सोमवारी सकाळी केदारनाथ धाम येथील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कधी पर्वतांमध्ये बसलेली दिसत आहे. तर कधी केदारनाथ धामच्या परिसरात फिरताना दिसत आहे. याव्यतिरिक्त सारा एका ठिकाणी जेवण बनवताना देखील दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान, साराला केदारनाथ मंदिराबाहेर बाहेन अनेक चाहत्यांना सुशांत सिंह राजपूतची देखील आठवण झाली. कारण साराने ‘केदारनाथ’ चित्रपटातूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात सुशांत देखील मुख्य भूमिकेत होता.हा चित्रपट 2013 मधील ‘केदारनाथ’ दुर्घटनेवर आधारित आहे, जेव्हा मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये भूस्खलन झाले होते.

सारा अली खान चा आगामी चित्रपट

साराचा ‘जरा हटके जरा बचके’ या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली होती. लवकरच ती ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा सिक्वेलमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार देखील असतील.

- Advertisement -

 


हेही वाचा : हॉलिवूड अभिनेता टायलर ख्रिस्तोफरचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -