घरमनोरंजनकोकणातील तरुणाचा ‘काहूर’

कोकणातील तरुणाचा ‘काहूर’

Subscribe

तळकोकणातील सिंधूदुर्ग जिल्ह्यात चित्रपट निर्मितीची संस्कृती किंवा परंपरा नसतानाही चित्रपट निर्मितीचा खर्चिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येथील काही तरूण झटत आहेत. त्यासाठी त्यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागत आहे. अशाच धडपडणार्‍या तरुणांपैकी एक उदाहरण म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील लेखक, दिग्दर्शक अनिल सरमळकर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘काहूर’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

ओरान फिल्म या बॅनरखाली हा चित्रपट प्रदर्शित होत असून याची कथा, पटकथा, संवाद, गीते आणि दिग्दर्शन या सर्व बाजू अनिल सरमळकर यांनीच सांभाळल्या आहेत. काहूर या चित्रपटाची विशेषत: म्हणजे यातील ‘छबय… छबय’ हे भन्नाट ठेका धरायला लावणारे होळीसणाच्या पार्श्वभूमीवरील गीत प्रख्यात गायक अवधुत गुप्ते यांनी गायले आहे.तर चित्रपटाला धमाकेदार संगीत दिले आहे ते निहार शेंबेकर यांनी.

- Advertisement -

काहूरची कथा देश, प्रदेश, जात, धर्म, पंथ या सर्वांपलीकडे जाऊन चौदा-पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलाच्या निरागस मनोविश्वाचा वेध घेणारी आहे. या कथेत थरार आणि रहस्यमयता आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण सावंतवाडी तालुक्यातील बांदा, सरमळे, केसरी, देवस, शिरशिंगे इत्यादी गावात व सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नाट्यगृहात करण्यात आले.

चित्रपटातील तांत्रिक बाजू कोल्हापूर, मुंबई व सिंधुदुर्गातील तंत्रज्ञ, कला दिग्दर्शक, वेशभूषाकार, मेकअपमन आदींनी सांभाळली आहे. तर, निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी ओरान क्राफ्टने सांभाळली आहे. तसेच काही महत्त्वाच्या भूमिका पुणे, मुंबई येथील रंगभूमी मराठी चित्रपट सृष्टीतील आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांनी साकारल्या आहेत.तसेच बाल व ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात दमदार भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचे पोस्ट-प्रोडक्शन पूर्णत्वास येत असून लवकरच तो प्रदर्शित होत आहे.

- Advertisement -

सुमारे दोन वर्षे या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू होती. चित्रपटामध्ये स्थानिक कलाकारांपासून ते ज्येष्ठ कलाकारांना संधी देण्यात आली आहे. यात येथील अनेक स्थानिकांनी मोठे योगदान दिले आहे. हे तरुण आणि कलावंत यांची जिद्द आणि सहकार्य कौतुकास्पद आहे.
-लेखक/दिग्दर्शक अनिल सरमळकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -