घरमनोरंजनयासाठी घेतला अरबाजसोबत घटस्फोट; मलायकाने सांगितले खरे कारण

यासाठी घेतला अरबाजसोबत घटस्फोट; मलायकाने सांगितले खरे कारण

Subscribe

घटस्फोटाच्या आदल्या रात्रीपर्यंत मला विचार करण्याची संधी कुटुंबीयांनी दिली होती. कोणालाही हा घटस्फोट व्हावा असे वाटत नव्हते त्यामुळे मित्रपरिवार आणि कुटुंबीयदेखील या घटस्फोटाच्या विराधात होते.

बॉलिवूडमधील पॉवर कपल ओळखल्या जाणाऱ्या मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी ११ मे २०१७ ला घटस्फोट घेतला. गेले १८ वर्ष हे दोघे विवाहबंधनात होते. पहिल्यांदाच मलायकाने आपल्या घटस्फोटानंतर त्यामागील खरं कारण स्पष्ट केले आहे. एका मुलाखती दरम्यान मलायकाने सांगितले की, ‘अरबाज आणि मी वेगळे झाल्यापासून माझ्या आयुष्यात खूप शांतता आहे. एवढचं नाही तर मी माझ्या जीवनात अतिशय सुखी आहे.’

कुटुंबीय आणि मित्रपरिवार विरोधात

करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वाँट १०४.८ एफम इश्क’ या शोमध्ये पहिल्यांदाच मलायकाने आपल्या घटस्फोटाबद्दल सांगितले. ती म्हणते, ‘जेव्हा मी आणि अरबाज घटस्फोट घेत होतो तेव्हा फॅन्स आणि आमचे घरचे कोणीच खुश नव्हते. पण आम्ही दोघे अशा परिस्थिती अडकलो होतो. जिथे आम्ही स्वत: तर खुश नव्हतो तसंच आमच्यासोबत असलेल्या कोणालाही खूश ठेऊ शकत नव्हतो. अरबाजसोबत घटस्फोट घेऊ नये असा सल्ला कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवारने मला दिला होता. घटस्फोटाच्या आदल्या रात्रीपर्यंत मला विचार करण्याची संधी कुटुंबीयांनी दिली होती. कोणालाही हा घटस्फोट व्हावा असे वाटत नव्हते. त्यामुळे मित्रपरिवार आणि कुटुंबीयदेखील या घटस्फोटाच्या विरोधात होते. मात्र मी आणि अरबाजने वेगळे होण्याचा निर्णय निश्चित केला होता.’

- Advertisement -

आता दोघही करतायत यांना डेट

‘माझ्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला माझी आणि अरबाजची काळजी वाटत होती. त्यामुळे आम्ही निर्णय बदलावा असे त्यांना मनापासून वाटत होते. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात’, असे मलायकाने करिनासोबत बोलताना सांगितले. सध्या मलायका आणि अरबाज दोघेही एका रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे. मलायका अर्जुन कपूरला डेट करतेय तर अरबाज मॉडल आणि एक्ट्रेस जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करतोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -