घरमनोरंजन8 Years of Sairat: 'सैराट'ची 8 वर्ष पूर्ण, आर्चीने शेअर केले खास...

8 Years of Sairat: ‘सैराट’ची 8 वर्ष पूर्ण, आर्चीने शेअर केले खास फोटो

Subscribe

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित सैराट (sairat) हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला.  आज या सिनेमाच्या रिलीजला आठ वर्षे झाली आहेत. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. आठ वर्षानंतर आजही चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.

आठ वर्षात एकाही मराठी सिनेमाला ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडता आला नाहीये, हे या सिनेमाचं यश आहे. कोणताही मोठा स्टार नाही, चकचकीत सेट्स नाही. गावच्या मातीतला, गावाच्या मातीतल्या कलाकारांना शोधून नागराज यांनी या सैराट घडवला. आज या सिनेमाच्या रिलीजला आठ वर्षे पूर्ण झाली असून महाराष्ट्राच्या लाडक्या आर्चीने काही अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘सैराट 2’ची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.

- Advertisement -

सैराट’ या चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. सिनेमागृहात एखाद्या जत्रेपेक्षा जास्त दंगा पाहायला मिळाला. गावाकडची मंडळी ट्रॅक्टरवर बसून थिएटरला जाताना दिसून आली. ‘सैराट’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. आर्ची-परश्याची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. या सगळ्या गोष्टीला आज 8 वर्षे पूर्ण होत आहेत. आठ वर्षांपूर्वी या सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्यांतच 25  कोटींची कमाई केली होती.

 ‘सैराट’ला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. आठ वर्षांपूर्वी रिंकू कशी दिसत होती, पडद्यामागे आकाशासोबतची मजामस्ती आणि घोड्यावर स्वार झालेली आर्ची.. अशी दृश्ये या फोटोंमध्ये पहायला मिळत आहेत. ‘सैराटला आज आठ वर्षे पूर्ण झाली’, असं कॅप्शन देत रिंकूने या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मास्टरपीस’, असं एकाने म्हटलंय. तर अनेकांनी चित्रपटांमधील गाण्यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं.

- Advertisement -

‘सैराट’मधील भूमिकेसाठी रिंकूला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 100 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता.

___________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -