घरमनोरंजनKshitij Prasad ड्रग्ज केस: बॉलिवूडच्या अभिनेत्यांची नावे घेण्यासाठी NCB च्या अधिकाऱ्याने धमकावलं!

Kshitij Prasad ड्रग्ज केस: बॉलिवूडच्या अभिनेत्यांची नावे घेण्यासाठी NCB च्या अधिकाऱ्याने धमकावलं!

Subscribe

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला धर्म प्रोडक्शन्सचा माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादने न्यायालयात NCB वर गंभीर आरोप केले आहेत. NCB ने माझा सातत्याने छळ केला असून अभिनेता रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांना ड्रग्ज प्रकरणात गुंतवण्यासाठी जबरदस्ती केली, असा धक्कादायक जबाब क्षितिज प्रसादने आज विशेष एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances) कोर्टात नोंदवला.

क्षितिज प्रसादची NCB कोठडीची मुदत संपल्याने NCB च्या अधिकाऱ्यांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी तपास यंत्रणेच्याविरोधात काही तक्रार आहे का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्यावेळी प्रसादने आपल्या जबाबात न्यायालयाला अभिनेता रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांना ड्रग्ज प्रकरणात गुंतवण्यासाठी जबरदस्ती केली. क्षितिज प्रसादने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिग्दर्शक करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शन्स कंपनीतील अनेकांची नावे जबाबात नोंदवण्यासाठी समीर वानखेडे यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणला, थर्ड डिग्रीचाही वापर केला. क्षितिजने दिलेल्या माहितीनंतर न्यायालयाने समीर वानखेडे यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, त्या अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणं असल्याने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं NCB च्या वकिलांनी सांगितलं. दरम्यान, न्यायाधीशांनी प्रसादला ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

क्षितिजने आपल्या जबाबात पुढे सांगितलं की, मला पहिल्यांदा २७ सप्टेंबरला न्यायदंडाधिकारी न्यायालयात एनसीबी कोठडी मिळवण्यासाठी हजर करण्यात आलं, तेव्हा मी न्यायाधीशांना छळवणुकीविषयी सांगितलं. न्यायधिशांनी याची नोंद करत ३ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी सुनावली. यानंतर वानखेडे यांनी माझा अतिरिक्त जबाब नोंदवला. या जबाबात खोट्या आणि त्यांना वाटेल त्या बऱ्याच गोष्टी घुसडून माझ्यावर दबाव टाकत माझी स्वाक्षरी घेतली. दरम्यान, पुन्हा एकदा माझ्यावर दबाव टाकत धर्मा प्रॉडक्शन्समधील काही ची नावे घ्यायला तसंच अभिनेता रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांनाही या प्रकरणात अडकवण्यास त्यांनी सांगितलं. मात्र, मी नकार दिला तेव्हा मला तुझी पत्नी आणि कुटुंबीयांनाही यात अडकवू, अशी धमकी दिली. क्षितिज प्रसादचे वकील Adv. सतीश मानेशिंदे यांनी आज याविषयी न्यायालयाला माहिती देऊन क्षितिज प्रसादचे लेखी म्हणणं सादर केलं. क्षितिजने साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊनही माहिती दिल्याचे मानेशिंदे यांनी सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -