घरमनोरंजनअंबानींनी प्री-वेडिंगला बोलावलं नाही म्हणून राखी नाराज, म्हणाली…

अंबानींनी प्री-वेडिंगला बोलावलं नाही म्हणून राखी नाराज, म्हणाली…

Subscribe

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत व राधिका मर्चंटचा प्री- वेडिंग सोहळा पार पडला. गुजरातमधील जामनगरमध्ये या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाला तारे-तारकांची मांदियाळी लोटली होती. बॉलिवूडच नाही, आंतरराष्ट्रीय कलाकारांची या भव्य सेलिब्रेशनमध्ये परफॉर्म केलं. हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंत अनेक कलाकार या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये दाखल झाले होते. उद्योगच नव्हे, बॉलिवूड, क्रीडा सर्व क्षेत्रातील दिग्गज भावी वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.  या सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.अशातच राखी सावंतने अंबानींनी या प्री-वेडिंग सोहळ्याला बोलावलं नाही म्हणून नाराजी व्यक्त केली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर राखी सावंतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राखी सावंत म्हणते, “अंबानी नमस्कार, तुम्ही मला प्री-वेडिंग सोहळ्याला का नाही बोलावलं? तुम्हाला माहितीये, मला जर तुम्ही बोलावलं असतं तर मी मंच, खुर्च्या तोडल्या असत्या. अंबानीजी तुम्ही अजून माझा डान्स पाहिला नाही. रिहाना, अ‍ॅकॉन अशा लोकांना तुम्ही का बोलावलं? हे माझ्यासमोर शेंगा आहेत. तुम्ही माझा डान्स पाहिलाय, ‘मुन्नी बदनाम’, ‘परदेसिया’ एवढी गाणी मी केली तरीही तुम्ही मला का बोलावलं नाही? हजार कोटी देऊन तुम्ही यांना बोलावलं. तरीही रिहाना फाटलेल्या कपड्यांमध्ये आली अंबानीजी. मी जर आली असती तर हॉट आणि सेक्सी कपडे घालून आली असती. माझ्या कपड्यांनी मी तुमचा स्टेज पुसला असता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

“मला बोलवण्याचे चार फायदे होते. मी मनोरंजन केलं असतं, डान्स केला असता, तुमचे जितके पाहुणे आले होते त्यांचं जेवून झाल्यानंतर सर्व भांडी घासली असती. सर्वांच्या खोल्या साफ केल्या असत्या. मी काय केलं नसतं. तुम्ही हजार कोटी खर्च करून कोणाला बोलावलं? अरे तुम्ही राखी सावंतला बोलावलं नाही. हे तुम्ही काय केलं?”, असं राखी सावंत म्हणाली. राखीचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्य़ा आहेत.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, 1मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -