घरमनोरंजनऋषीचा मराठमोळा अंदाज!

ऋषीचा मराठमोळा अंदाज!

Subscribe

लवकरच एक गणपतीवर आधारीत वक्रतुंड महाकाय हा अल्बम रसिकांसाठी येणार आहे. या अल्बममध्ये ऋषी सस्केना दिसणार आहे. या अल्बममधील गाणी नचिकेत जोग याची आहेत तर अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजात ती स्वरबद्ध झाली आहेत.

एका अमराठी अभिनेत्याने मराठी मालिकेमध्ये प्रवेश केला आणि तो अल्पावधीतच सगळ्यांचा लाडका झाला. असा अभिनेता म्हणजे काहे दिया परदेस या मालिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला अभिनेता ऋषी सक्सेना. ऋषीने साकारलेल्या शीवच्या भूमिकेतून त्याने कमी वेळातच प्रेक्षकांना अपलंस केलं. लवकरच तो वक्रतुंड महाकाय व्हीडिओ अल्बममध्ये दिसणार आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीच नवनवीन गाणी – अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अनेकवेळा जुन्या पारंपरिक गाण्यांना नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आणले जाते. तसाच लवकरच एक गणपतीवर आधारित वक्रतुंड महाकाय हा अल्बम रसिकांसाठी येणार आहे. या अल्बममध्ये ऋषी सस्केना दिसणार आहे. या अल्बममधील गाणी नचिकेत जोग याची आहेत तर अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजात ती स्वरबद्ध झाली आहेत. तर सुहीत अभ्यंकरचं संगीत लाभलं आहे. या गाण्यांत ऋषीबरोबर रिचा अग्निहोत्री दिसणार आहे.

- Advertisement -

या गाण्याचं पोस्टर नुकतंच ऋषीने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. या पोस्टरवरचा त्याचं अंदाज नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. कारण मराठी मालिकेत काम केल्यानंतर ऋषीला मराठमोठ्या अंदाजात पाहण्याची इच्छा त्याच्या चाहत्यांची होती. त्यामुळे ऋषीचा हा मराठमोठा अंदाज प्रेक्षकांना नक्की आवडेल.

काहे दिया परदेस या मालिकेतून मराठीत पदापर्ण केल्यानंतर ऋषीने मराठी चित्रपटसृष्टीतच काम करण्याचा निर्णय घेतला. घाडगे & सून या मालिकेत देखील त्याने छोटीशी भूमिका केली होती. त्याचप्रमाणे इश्काची नौका या व्हीडिओमध्ये देखील तो दिसला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -