घरमनोरंजनशाहरुखला अभिनय येत नाही... पाकिस्तानी अभिनेत्रीची टीका

शाहरुखला अभिनय येत नाही… पाकिस्तानी अभिनेत्रीची टीका

Subscribe

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. आपल्या अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे शाहरुखचे जगभरात करोडो चाहते आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटातील शाहरुखच्या लूकने अनेकांना भुरळ पाडली. दरम्यान, अशातच एका पाकिस्तानी अभिनेत्रीने शाहरुखच्या अभिनयावर आणि लूकवर कमेंट केली आहे.

Was Mahnoor Baloch forced into Acting by her In-Laws? | DESIblitz

- Advertisement -

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अभिनेत्री महनूर बलोचने एका पाकिस्तानी टॉक शो ‘हद करदी’मध्ये शाहरुखच्या लूक आणि अभिनयाबद्दल कमेंट केली. यात शाहरुखबद्दल बोलताना ती म्हणाली की, “शाहरुखचे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक आहे पण त्याला नीट पाहिले तर त्याचा लूक इतका खास नाही. मात्र, त्याचे व्यक्तिमत्त्व आणि ओरा (आभा) इतका मजबूत आहे की, त्यामुळे तो खूप आकर्षक आणि छान दिसतो. त्याच्याकडे ओरा (आभा) आहे. पण असे अनेकजण आहेत त्यांच्याकडे लूक आहे पण ओरा (आभा) नाही ज्यामुळे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही.”

शाहरुखला अभिनय येत नाही

Shahrukh Khan Net Worth 2023: Earnings Investments Business

- Advertisement -

 

पाकिस्तानी अभिनेत्री महनूर पुढे म्हणाली की, “मला वाटतं की, शाहरुखला अजिबात नीट अभिनय करता येत नाही. मात्र, तो चांगला व्यवसायी आहे आणि त्याला स्वतःचं मार्केटिंग कसं करायचं हे चांगले ठाऊक आहे. कदाचित त्याचे चाहते आणि इतर अनेकजण माझ्याशी सहमत नसतील. पण काही फरक पडत नाही. त्याच्याकडे चांगले काम आहे. व्यक्तिमत्त्व, तो स्वत: ला चांगले मार्केट करतो. परंतु इतर अनेक चांगले अभिनेते आहेत जे त्याच्यासारखे यशस्वी नाहीत.” असं महनूर म्हणाली.

दरम्यान, महनूरच्या या कमेंट्समुळे शाहरुखचे चाहते सध्या तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. अनेकांच्या मते शाहरुख बद्दल वाईट बोलून महनूर प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहे.


हेही वाचा :

‘ओह माय गॉड 2’ मध्ये यामी गौतम साकारणार वकीलाची भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -