घरमनोरंजन'लगन' चित्रपटातून स्मिता तांबे साकारणार दमदार भूमिका

‘लगन’ चित्रपटातून स्मिता तांबे साकारणार दमदार भूमिका

Subscribe

या चित्रपटातील तिच्या व्यक्तीरेखेच नाव राधा असून खेडयात राहणाऱ्या ऊसतोड़णी कामगाराची भूमिका स्मिताने चित्रपटात साकारली आहे.

जी.बी.एंटरटेंन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर दिग्दर्शित ‘लगन’ हा आगामी चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपट, मालिका, वेबसिरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता तांबे या चित्रपटात एक दमदार भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील तिच्या व्यक्तीरेखेच नाव राधा असून खेडयात राहणाऱ्या ऊसतोड़णी कामगाराची भूमिका स्मिताने चित्रपटात साकारली आहे. करारी, कणखर तरीही सोज्वळ अशा छटा राधा या व्यक्तिरेखेला आहेत. यात राधा एका आईची व्यक्तिरेखा आहे, जी आपल्या मुलांसाठी अनेक कष्ट घेत असते. स्मिताचा खेडवळ लूक यामध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वत: बैलगाडी चालवली आहे. तसेच ऊसाच्या मोठ्मोठया मोळया डोक्यावर घेत उन्हातान्हात शूटिंग केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांतून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

चित्रपटातील व्यक्तीरेखेबाबत स्मिता म्हणते की, ‘हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंदी आणि तेवढंच आव्हानात्मक होतं. मुळात प्रत्येक स्त्री मध्ये खूप माया दडलेली असते. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडपड असते. हे पात्र साकारताना, प्रत्येक आईची ती तळमळ दाखवणं, एवढंच मी या माझ्या भूमिकेतून केलं आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने गावातील जीवनपद्धती पुन्हा एकदा जवळून बघता आली याचा ही आनंद आहे’.

ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटात प्रेमाचे नवे रंग, नवे ढंग, प्रामाणिक भाव आणि नवी परिभाषा रसिकांना पहायला मिळणार आहे. ‘लगन’ चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. पार्श्वसंगीत

- Advertisement -

अडचणींवर मात करत प्रेमाची साथ निभावणार्‍या अनोख्या प्रेमाची गोष्ट ‘लगन’ चित्रपटात ६ मे ला पहायला मिळणार आहे.

 

हेही वाचा : “इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी” हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -