घरमनोरंजनशिवगामीच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

शिवगामीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

Subscribe

पहिल्या दोन भागात शिवगामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही आता या सिरिज मध्ये दिसणार नाही आहे.

लोकप्रिय चित्रपट बाहुबली याने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. यानंतर या चित्रटाच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळाली होती. चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या चर्चा रंगल्या होत्या. नुकतच या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ‘बाहुबली: बिफोर द बिगिनिंग’ असे या आगामी सिरिजचे नाव आहे. पहिल्या दोन भागात शिवगामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही आता या सिरिज मध्ये दिसणार नाही आहे. विशेष म्हणजे या आगामी सिरिजचे ७५ टक्के चित्रीकरण पूर्ण झालं होतं. परंतु नेटफ्लिक्सला हे चित्रीकरण आवडले नसल्याने त्यांनी पुन्हा नव्याने नव्या लोकेशनसह या सिरिजचे चित्रीकरण करण्यास निर्मात्यांना सांगितले आहे. मात्र आता या सिरिजमध्ये मृणालऐवजी अभिनेत्री वामिका गाबी हिची वर्णी लागली आहे. मृणासह इतर अनेक नवीन कालाकार या सिरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Wamiqa Gabbi (@wamiqagabbi)

 ‘बाहुबली’ चे दोनही चित्रपट सुपहिट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय नेटफ्लिक्सने केला आहे. बाहुबलीचा जन्म होण्यापूर्वी काय घडले होते? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अखेर प्रेक्षकांच्या आग्रास्तव दिग्दर्शक एस. एस. राजमौली याच्या तिसऱ्या भागाची निर्मिती करत आहेत. या सिरिजसाठी नेटफ्लिक्सने आतापर्यंत एकून २०० कोटी रुपये खर्च केले आहे. त्यामुळे आता या सिरिजमध्ये अजून कोणकोणत्या भूमिका नव्याने समोर येतील याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

- Advertisement -

हे वाचा- भरर स्त्यात राखीला कोसळले रडू, म्हणाली सलमान आणि सोहेलने वाचवला माझ्या आईचा जीव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -