घरमनोरंजनदीपिका-रणवीरच्या नव्या घराचा व्हिडीओ व्हायरल

दीपिका-रणवीरच्या नव्या घराचा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. दीपिका-रणवीर नेहमीच त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी हे दोघे करण देओलच्या रिसेप्शन पार्टीमध्ये दिसून आले होते. यादरम्यानचे त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच, सध्या सोशल मीडियावर दीपिका-रणवीरच्या ड्रीम हाऊसचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकत्याच काही दिवसांपूर्वी या दोघांनी आपल्या अंडरकंस्ट्रक्शन घराची पाहणी केली होती. त्यांचे हे घर 4 मजली असून हे बँडस्टँडच्या एका मोठ्या बिल्डिंगमध्ये 16,17,18 आणि 19 व्या मजल्यावर आहे. या घराची किंमत 119 कोटींच्या घरात आहे. या आलिशान घराव्यतिरिक्त दीपिका-रणवीरचा अलिबानमध्ये एक फ्लॅटही आहे. सध्या या घराचे बांधकाम सुरु असून ते पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटात दिसणार दीपिका-रणवीर

 

नुकत्याच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटामुळे दीपिका चर्चेत होती. आगामी काळात दीपिका ‘फायटर’  या चित्रपटात दिसणार आहे. तर रणवीर सिंह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. शिवाय लवकरच हे दोघे  ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये देखील दिसणार आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

प्रेग्नेंट सना खानला आईने केली मदत, पण झाली Troll

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -