घरमनोरंजन...म्हणून सलमान घालतो काळ्या रंगाचे कपडे

…म्हणून सलमान घालतो काळ्या रंगाचे कपडे

Subscribe

म्हणून बॉलिवूडचे दबंग स्टार सलमान खान जास्त काळ्या रंगाचे कपडे घालतो

बॉलिवूड विश्वात चाहत्यांमध्ये फेमस असणारा भाईजान म्हणजेच सलमान खान नेहमीच कूल स्टाईलमध्ये दिसत असतो. सलमान खान साधारण जीन्स आणि टी-शर्ट घातलेल्या कपड्यातच बघायला मिळतो. फॉर्मल शर्टपेक्षा सलमान जास्त करून जीन्स आणि टी-शर्टमध्ये असतो. सलमानच्या ड्रेसिंग स्टाईलचा विचार करायचा झाला तर तो जास्त करून काळ्या रंगाचे कपडे घालणे अधिक पसंत करतो.

काळा रंग निवडण्यामागे अभिनेता सलमान खानचे डिझायनर ऐशले रेबेलोने नुकतेच सोशल मीडियावरील सलमानच्या चाहत्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. या दरम्यान एका युजर्सने विचारले, ‘कृपया सलमानच्या स्टाईलमध्ये बदल करा, सलमान नेहमी काळ्याच रंगाचे कपडे का परिधान करतात.’ या प्रश्नावर ऐशले रेबेलोने अनोख्या अंदाजात उत्तर देताना सांगितले की, ‘कारण सलमान खानना इतर कोणताच रंग आवडत नाही.’

- Advertisement -

म्हणून बॉलिवूडचे दबंग स्टार सलमान खान जास्त काळ्या रंगाचे कपडे घालतो आणि काळ्या रंगाच्या कपड्यातच कोणत्याही प्रोग्राममध्ये दिसतो. काळ्या रंगाच्या शर्टमध्ये सलमान खान जास्त हॅण्डसम दिसतो.

 

View this post on Instagram

 

Thanx everyone for such warm wishes!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

- Advertisement -

सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, सलमानचा ‘भारत’ या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. यासोबतच ‘दबंग 3’ चित्रपटाच्या शुटिंगमध्येही सध्या सलमान व्यग्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -