घरभक्तीआज वर्षातील शेवटची संकष्टी; जाणून घ्या खास उपाय

आज वर्षातील शेवटची संकष्टी; जाणून घ्या खास उपाय

Subscribe

गणपती बाप्पाचा आर्शिवाद प्राप्त करायचा असेल तर संकष्टी चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम मानला गेला आहे. आज 2022 मधील शेवटची संकष्टी आहे. त्यामुळे पुढील वर्ष तुम्हाला उत्तम जावे यासाठी बाप्पाची मनोभावे पूजा करण्यासाठी हा उत्तम दिवस आहे.

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
संकष्टी चतुर्थी प्रारंभ : 11 डिसेंबर संध्याकाळी 4:14 पासून
संकष्टी चतुर्थी समाप्ती : 12 डिसेंबर संध्याकाळी 6:48 पर्यंत असणार आहे. तसेच चंद्रोदय रात्री 8:40 वाजता होईल.

- Advertisement -

चंद्रोदयानंतर करा पारण
हिंदू मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदयानंतर सोडला जातो. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यानंतर बाप्पाची पूजा केली जाते.

अशा प्रकारे करा संकष्टी चतुर्थीची पूजा
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. शुभ मुहूर्तावर श्री गणेशांचा अभिषेक करा. त्यांना चंदन, फळ, लाल फुल, धूप, दीप, दुर्वा, अक्षता, मोदक अर्पण करा. तसेच श्रीगणेश चालीसेचे पठण करा. श्रीगणेशांची आरती करा.रात्री चंद्रोदयानंतर व्रताचे उद्यापन करा.

- Advertisement -

संकष्टी चतुर्थीला करा ‘हे’ उपाय

  • आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला शेंदूर अर्पण करा. सोबतच दूर्वा देखील अर्पण करा.
  • आर्थिक लाभासाठी श्री गणेशाला नियमीत पूजा केल्याने दूर्वा अर्पण करा. सोबतच इदं दुर्वादलं ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा.
  • संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश अथर्वशीर्षष्याचे पठण करा. यामुळे बाप्पा खूश होतात.
  • कर्जापासून मुक्ती मिळावी यासाठी बाप्पाला गूळ आणि तूप अर्पण करा. यामुळे नक्कीच कर्ज कमी होण्यास मदत होईल.
  • बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 21 दुर्वा आणि जास्वंदीचे फुल अर्पण करा.

हेही वाचा :

Vastu Tips : दुर्भाग्य दूर करण्यासाठी आजपासूनच करा पितळेच्या भांड्याचे ‘हे’ उपाय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -