घरलाईफस्टाईलएकट्या प्रवासाला जाताय मग 'या' चुका टाळा

एकट्या प्रवासाला जाताय मग ‘या’ चुका टाळा

Subscribe

सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे एकट्याने प्रवास केल्याने प्रत्येकाला बरे वाटू शकते. जगापासून दूर स्वतःमध्ये हरवून जाण्यासाठी, एकट्याने प्रवास करण्याचे योजना बनविली जाते. एकट्याने प्रवास करताना एक वेगळाच अनुभव मिळतात. सोलो ट्रॅव्हलिंग करताना ना कोणाचे टेन्शन ना जबाबदारी. प्रवास करताना कुठेही बाहेर जाण्याचा अनुभव सोलो ट्रॅव्हलला अधिक खास बनवतो. पण, जेव्हा महिला किंवा मुली एकट्याने प्रवास करतात तेव्हा सुरक्षेचा विचारही मनात येतो.

केवळ भारतातच नाही तर जगभरातील बहुतांश ठिकाणी महिलांना एकट्याने प्रवास करण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तुम्ही देखील एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत आहात, तर तुम्ही कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

माहिती घेणे गरजेचे

ज्या ठिकाणी तुम्ही एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत आहात तेथे जाण्यापूर्वी त्याची माहिती घ्यावी. जेणे करून त्या  ठिकाणच्या भा परंपरा आणि कायदा याबद्दल आधीच माहिती जाणून घ्या, अशा प्रकारे या ठिकाणी भेट द्यायची की नाही हे तुम्हाला कळेल. कोणतीही माहिती घेतल्याशिवाय डेस्टिनेशनवर पोहोचण्याची चूक खूप महागात पडू शकते.

- Advertisement -

कुटुंब्यांच्या टेचमध्ये रहा

सर्वप्रथम, तुमचा प्रवासाची माहिती ही तुमच्या कुटुंबियांना किंवा जवळच्या व्यक्तींना कळवा. त्यांना हॉटेल, वाहतूक आणि संपर्कसहीत माहिती द्यावी. याशिवाय, तुमचे डेस्टिनेशन देखील तुमच्या कुटुंबियांना सांगा.

सुरक्षित ठिकाणी रहा

तुम्ही ज्या ठिकाणी फिरण्यासाठी जाणार असाल, तेथे पोहोचल्यानंतर हॉटेल बुक करण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. तुम्ही जिथे राहणार असाल तेथील हॉटेलची ऑनलाइन रिव्यू वाचा. 24 तास सुरक्षेची सुविधा असेल, कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक असतील, अशी निवास व्यवस्था निवडा.

स्थानिकांशी संवाद साधा

जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जाणार असाल तर सुरक्षिततेचा उत्तम मार्ग म्हणजे तेथील स्थानिक लोकांमध्ये मिसळणे. यासाठी डेस्टिनेशनचा ड्रेस घाला. शहरांचा पेहराव वेगळी ओळख निर्माण करतो आणि अशा स्थितीत गोष्टी चुकीच्या ठरू शकतात. स्थानिक कपडे घालून तुमची दखल घेतली जात नाही.

संपर्कात रहा

मोबाईल नेहमी सोबत ठेवा,  याशिवाय आपत्कालीन क्रमांक तुमच्याजवळ ठेवा आणि डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांचा नंबर तुमच्या फोन किंवा डायरीमध्ये सेव्ह करा. पोर्टेबल चार्जर सोबत नेण्यास विसरू नका.

काळजी घ्या

आपल्या सभोवतालच्या वातावरणाबद्दल नेहमी सतर्क राहण्याचा प्रयत्न करा. प्रवासादरम्यान, निर्मनुष्य असलेले रस्त्यांवर जाऊन नका. विशेषतः रात्री प्रवास करू नका. तुमच्या सभोवतालच्या लोकांकडेही लक्ष देण्याचा प्रयत्न करा. तसेच असुरक्षिततेचे वातावरण नसेल, अशी वाहतूक निवडा. याशिवाय तुम्हाला मूलभूत स्वसंरक्षण माहीत असली पाहिजे.


हेही वाचा – हे आहेत कर्नाटक मधील बेस्ट Monsoon Picnic स्पॉट

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -