घरमहाराष्ट्रविनायक राऊतांचे निलेश राणेंना आव्हान, म्हणाले - "लोकसभेच्या रिंगणात उतरावे, मग..."

विनायक राऊतांचे निलेश राणेंना आव्हान, म्हणाले – “लोकसभेच्या रिंगणात उतरावे, मग…”

Subscribe

भाजपचे नेते निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांची समजूत काढण्यात भाजपला यश आले असली तरी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी या मुद्द्यावरून निलेश राणेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली, ज्यामुळे कोकणाच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपमधील मंत्री आणि नेते रविंद्र चव्हाण यांच्यामुळे नाराज असलेल्या निलेश राणे यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला, असे बोलण्यात येत होते. ज्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा स्वतः रविंद्र चव्हाण यांच्याकडून करण्यात आला. तर चव्हाण यांच्यासह निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. पण या सगळ्या मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी राजकीय निवृत्ती घेऊ नये, असा सल्ला देत राऊतांनी राणेंना आव्हान दिले आहे. (MP Vinayak Raut’s challenge to Nilesh Rane after his decision to retire)

हेही वाचा – ‘सदावर्तेंची ही राजकीय खेळी…’, एसटी संपाच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारेंची सडकून टीका

- Advertisement -

निलेश राणे यांच्या निवृत्तीबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, निलेश राणेंनी राजकीय निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावे. मग, पराभव काय असतो, ते दाखवतो. राजकीय नाटक कसे करायचे, हे राणे कुटुंबाकडून शिकूव घ्यावे. एकीकडे नारायण राणेंनी निलेश राणेंना फटकारले आहे. तर, दुसरीकडे नितेश राणेंनी निलेश राणेंना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोकण दौऱ्यात आले असताना निलेश राणेंना कुठे स्थान मिळाले, हे सर्व लोकांनी पाहिले आहे, असा हल्लाबोल राऊतांकडून करण्यात आला आहे.

फडणवीसांनी सांगितल्यामुळे निलेश राणेंनी वळवळ चालू केली आहे. पण, ही फार दिवस चालणार नाही. निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावे. पराभव काय असतो, ते दाखवतो, असे थेट आव्हान विनायक राऊत यांच्याकडून करण्यात आले आहे. राणे कुटुंबिय विरुद्ध विनायक राऊत हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद आहे. या वादामुळे आजपर्यंत कोकणाच्या राजकारणात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. परंतु, आता विनायक राऊत यांनी थेट निलेश राणे यांच्यावरच टीका केल्याने त्यांच्याकडून याला नेमके काय प्रत्युत्तर देण्यात येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -