घरलाईफस्टाईलतुम्हांलाही अशी स्वप्न पडतात का ? काय असतो त्याचा अर्थ?

तुम्हांलाही अशी स्वप्न पडतात का ? काय असतो त्याचा अर्थ?

Subscribe

‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे बोलले जाते. यामागचे कारणही तसेच आहे. कारण आपल्या मनात असंख्य विचारांचे वादळ सुरू असते. कधी पैशांसंदर्भात तर कधी नोकरी, नातेसंबंध, आजारपण तर कधी विविध घटनांसंबधात. यामुळे बऱ्याचवेळा याच विषयांवर आधारित स्वप्न पडतात. तर कधी कधी मनात कुठलाच विचार नसताना विचित्र स्वप्नही दिसतात. पण तुम्हांला माहित आहे का प्रत्येक स्वप्नामागे एक संदेश असतो. जो तुम्हांला सूचना देत असतो. तुमच्या भविष्यात काय घडणार याची ती सूचना असते.

स्वप्नात जीने चढणे आणि उतरणे

- Advertisement -

स्वप्नात जीने चढताना आणि उतरताना दिसणं याचा अर्थ तुमच्या प्रगतीचा आलेख आता उंचावत आहे. य़शाच्या पायऱ्या तुम्ही चढणार आहात किंवा चढत आहात. अनेक आव्हानांचा सामना करत आहात.

कड्यावरून खाली पडणे

- Advertisement -

आपल्यापैकी बऱ्याचजणांना कड्यावरून ते खाली कोसळतानाचे स्वप्न पडत असते. हे स्वप्न बघून अनेकांना झोपेत घाम फुटतो. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही मृत्यूच्या दिशेने पुढे जात आहात. यामुळे वेळेआधीच तुमची कामे करून घ्या. या स्वप्न तुम्ही डिप्रेशन मध्ये जात असल्याचे  संकेत देतं.  यामुळे वेळीच सावध व्हा.

स्वप्नात साप दिसणे
स्वप्नात साप दिसणे याचा अर्थ तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांपासून तुम्ही सावध राहा. तुमचा मित्र म्हणून जो तुमच्या जवळ आला आहे. तोच तुमचा मोठा शत्रू आहे.

रस्ता भटकणे, हरवणे
आपल्यापैकी अनेकजणांना स्वप्नात ते रस्ता हरवल्याचे दिसते. तसेच रस्ता चुकत असल्याचा, भरकटत जात असल्याचा स्वप्नाचा अर्थ जी व्यक्ती हे स्वप्न पाहात आहे. ती लक्ष्य भटकलेली आहे.

कोणीतरी पाठलाग करणे

बऱ्याचदा स्वप्नात काहीजणांना कोणीतरी त्यांचा पाठलाग करत असल्याचे दिसत असते. तसेच एका क्षणाला ती व्यक्ती त्यांना ठारही करते. असे स्वप्न पडते. याचा अर्थ तुम्हांला कोणीतरी मारू इच्छित आहे.

स्वत:ला हवेत उडताना पाहणे

झोपेत स्वत:ला हवेत उडताना पाहणे हे शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्ही तुमचा टार्गेट पूर्ण केलं. याचाच आनंद तुम्ही साजरा करत आहाते.

पाणी- पाणी

स्वप्नात जर तुम्हांला चारही बाजूला  पाणीच पाणी दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही कमालीचे टेन्शन मध्ये आहात. लाईफमध्ये तुम्ही खूप संवेदनशील झाला आहात.

तर दुसरीकडे तुम्ही तळ्यात, डबकयात, नदीच्या बाजूला पाण्यात बुडत असलेले दिसत असेल तर याचा अर्थ संकट परत येते.. असा होतो. तुम्ही संकटाच्या भोवऱ्यात अडकला आहात. वेळीच सावध व्हा …असा या स्वप्नाचा अर्थ होतो.

आग दिसणे

स्वप्नात आग दिसणे हा शुभसंकेत आहे. या स्वप्नाचा अर्थ तुमच्या निडर स्वप्नाला कोणीतरी स्ट्रेंथ देणारं आहे. तसेच तुमची सेक्सलाईफही धोक्यात आली आहे.

स्वप्नात जेवणाचे ताट दिसणे

स्वप्नात जेवणाचे भरलेले ताट दिसणे म्हणजे तुमच्या अडचणी दूर होणार आहेत. तुमच्या डोक्यातील कल्पना अफाट आहेत. पण त्या पूर्ण करायच्या आहेत.

स्वप्नात मृत्यू दिसणे. – स्वप्नात स्व;ताचा मृतदेह पाहणे कठिण आहे. पण याचा अर्थ असा होतो की आयुष्यात सुरू असलेल्या अडचणी, मतभेद. भांडण यांचा अंत होणार आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -