घरलाईफस्टाईलअशी मिळवा पफी आयच्या समस्येपासून मुक्ती

अशी मिळवा पफी आयच्या समस्येपासून मुक्ती

Subscribe

डोळ्यांच्या खाली आलेली सूज ही पफी आय या नावाने ओळखली जाते.ज्याचा परिणाम चेहर्‍याच्या सौंदर्यावर दिसून येतो. पण काही उपाय करून या पफी आयची समस्या आपण दूर करू शकतो.डोळे ही निसर्गाने दिलेली खूप सुंदर देणगी आहे. ज्यामुळे आपण हे सुंदर जग बघू शकतो.या डोळ्यांची काळजी आणि देखभाल करणेही खूप महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर .

* डोळ्यांच्या खालची आणि बाजूची त्वचा ही खूप पातळ तसेच नाजूक असते.लिंफ एकत्र येण्याने डोळ्यावर सूज येते. नियमित बदामतेल किंवा व्हिटॅमिन ई तेलाने डोळ्यांच्या सभोवताल हळुवार मसाज केल्याने ही समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळते.

- Advertisement -

* पफी आयच्या समस्येत काकडी ही खूप महत्त्वाची ठरते.काकडी किसून डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे डोळ्यांची सूज आणि वेदनांपासून मुक्ती मिळेल.

* इस्ट आणि शार्क माश्याच्या लिव्हर ऑईल पासून बनवलेल्या क्रिम / तेलाने मसाज करा.

- Advertisement -

* टी बॅग थंड पाण्यात भिजवा आणि ८-१० मिनिटे डोळ्यांवर ठेवा. असे केल्याने लिंफ ड्रेनेज होतं.

* एक स्टिलचा चमचा घेऊन काही वेळ थंड पाण्यात ठेवा. मग हा चमचा पफी आयच्या भागात थोडावेळ ठेवा. समस्येपासून बर्‍याच प्रमाणात मुक्ती मिळवता येते.

* पफी आयची समस्या झाल्यास लिंफैटीक ड्रेनेज नावाची ट्रिटमेंट खूप उपयुक्त ठरते.ही तुम्हाला कुठल्याही चांगल्या कॉस्मेटीक क्लिनिकमध्ये करता येईल.

* लघवी संबंधी कोणतीही समस्या असल्यास पफी आयची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे लघवीची तपासणी करून त्वरित उपचार करावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -