घरलाईफस्टाईलआरोग्यदायी 'दुर्वा'

आरोग्यदायी ‘दुर्वा’

Subscribe

जाणून घ्या आरोग्यदायी दुर्वा

गणपतीपूजनाच्या साहित्यामध्ये दुर्वांचा समावेश केला जातो. दुर्वा हा लाडक्या बाप्पाला वाहिला जातो. मात्र, हा पूजनापूर्ताच मर्यादीत नसून दुर्वांना आयुर्वेदामध्ये महाऔषधीचे स्थान दिले आहे. अनेक पौष्टिक आणि औषधी गुंणानी युक्त दुर्वाचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. जाणून घेऊया, असेच काही आरोग्यदायी दुर्वांचे महत्त्व.

डोकेदुखी

ज्या व्यक्तींचे काही कारणास्तव डोकेदुखीचा त्रास होत असेल, त्यांनी दुर्वा आणि चुना समप्रमाणामध्ये घेऊन पाण्याच्या मदतीने बारीक वाटून घ्यावा. ही लेप कपाळावर लावाला. त्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

डोळ्यांमधील घाण

ज्यांच्या डोळ्यांवर काही कारणाने सतत चिकटा रहात असेल किंवा डोळ्यांमधून घाण येत असेल, त्यावेळी दुर्वा पाण्यासोबत बारीक वाटून घेऊन ही पेस्ट एका मऊ कपड्यामध्ये बांधावी. हा कपडा डोळ्यांवर ठेवावा. यामुळे डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळे सतत लाल असणे अश्या नेत्राव्याधींवर ही दुर्वांचा लेप गुणकारी ठरतो.

नाकातून येणारे रक्त

उष्णतेमुळे अनेकदा नाकातून रक्त येते. अशावेळी दुर्वांच्या रसाचे काही थेंब नाकामध्ये सोडल्याने नाकातून येणारे रक्त बंद होण्यास मदत होते.

- Advertisement -

तोंडातील फोड

तोंडात फोड आल्यास किंवा तोंड येते अशावेळी दुर्वांचा रस पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने चुळा भरल्याने आराम पडतो.

उलट्या

उलट्या होत असल्यास एक लहान चमचा दुर्वांचा रस पाजल्याने आराम मिळतो

अतिसार

जर एखाद्या वेळेस अतिसार होत असल्यास त्या व्यक्तीने दुर्वाच्या रसाचे सेवन केल्यास फायदा होतो.

पोट बिघडणे

पोट बिघडून वारंवार जुलाब होत असतील, तर पाण्यामध्ये बडीशेप, सुंठ आणि दुर्वा एकत्र उक्लीन घेऊन हे पाणी पिण्यास द्यावे. यामुळे पोट बिघडल्यामुळे जुलाब कमी होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -