घरलाईफस्टाईलकेस वाढीसाठी बनवा घरच्या घरी 'आवळा तेल'

केस वाढीसाठी बनवा घरच्या घरी ‘आवळा तेल’

Subscribe

प्रत्येक स्त्रीला आपले केस हे लांबसडक आणि सिल्की असावे असे वाटते. मग, अशावेळी काय करावे असा देखील प्रश्न पडतो. तर अनेक स्त्रिया याकरता केमिकलचा देखील वापर करतात. विविध तेल देखील लावतात. मात्र, यामुळे केसांचे अधिक नुकसान होते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी तेल बनवून त्याचा वापर करु शकता. यामुळे तुमचे केस लांबसडक होण्यास आणि सिल्की होण्यास मदत होईल.

असे तयार करा आवळा तेल

आवळा तेल घरी बनवण्यासाठी सर्वात आधी आवळे चिरुन घ्या. त्यानंतर त्याची मिक्सरला पेस्ट लावून घ्या. त्यानंतर ही तयार झालेली पेस्ट नारळाच्या तेलात मिक्स करुन घ्यावी. नंतर हे मिश्रण घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये आठवडाभर बंद करुन ठेवा. त्यानंतर हे तेल गाळणीने गाळून घ्या. अशाप्रकारे हे तेल वापरण्यास तयार होईल.

- Advertisement -

हे तेल आठवड्यातून दोन दिवस केसांना लावा आणि चांगल्या प्रकारे मसाज करा. त्यामुळे केसांच्या मुळांशी ते जिरण्यास मदत होईल. तेल लावल्यानंतर ते केसांवर साधारण पाऊण तास राहू द्यावे आणि नंतर केस नेहमीप्रमाणे धुवून घ्यावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -