घरलाईफस्टाईल...म्हणून साजरी केली जाते रमजान ईद

…म्हणून साजरी केली जाते रमजान ईद

Subscribe

देशभरात आज 'ईद-उल-फित्र' अर्थात रमजान ईद मोठ्या जल्लोषात साजरी

संपुर्ण देशभरात आज ‘ईद-उल-फित्र’ अर्थात रमजान ईद मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. देशभरात रमजान ईद मुस्लिम बांधवाकडून मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. संपुर्ण महिनाभर रोझाचे उपवास केल्यानंतर ५ जून अर्थात रमजान ईद साजरा करण्यात येत आहे. सर्वत्र ठिकाणी असणाऱ्या मशिदींमध्ये सकाळपासून नमाज अदा करून मिठी मारत एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्यात.

रमजान म्हणजे नेमके काय?

रमजान म्हणजे ‘बरकती’ आणि ईद म्हणजे ‘आनंद’. परस्परांमध्ये आपुलकू वाढविणारा हा महिना मानला जातो. रमजान ईद या दिवसाला ‘ईद-उल-फित्र’ असेही म्हणतात. हा महिना आणि हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय असा मानला जातो, म्हणून आजच्या देशभरात ईद उत्साहात साजरी केली जाते.

- Advertisement -

या दिवशी अल्लाहचे आभार

मुस्लिम बांधव इस्लामिक दिनदर्शिकेनुसार रमजानच्या महिन्यात ३० दिवसांचा रोजा मुस्लिम ठेवतात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र म्हणजे ईद ही चंद्र दर्शनानेच साजरी केली जाते. मुस्लिम बांधव महिनाभराचे उपवास करतात. ही उपवास करण्याची शक्ती दिल्याबद्दल अल्लाहचे मनापासून आभार मानतात. रमजानमध्ये गरिबांना मदत करून मोठा दानधर्म केला जातो.

म्हणून रमजानला असते महत्त्व

पवित्र कुरान याच महिन्यात अवतरले असल्यामुळे इस्लाममध्ये रमजानला मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. ‘जंग-ए-बदार’ ची लढाई जिंकल्यानंतर खुद्द पैगंबरांनी त्यांच्या अनुयायांसह पहिली ‘ईद-अल-फितर’ साजरी केली असल्याचे समजते.

- Advertisement -

खास शिरखुर्म्याची मेजवानी

रमजान ईदच्या दिवशी सकाळी नमाज अदा केल्यानंतर दहीभात आणि साखर यांचे जेवण केले जाते. यासोबत खारका खाण्याची देखील पद्धत आहे. या दिवशी दुधात शेवया टाकून खीर खाण्याची आणि इतरांना देण्याची प्रथा आहे. यावेळी मिठाई आणि शिरखुर्मा या दोन पदार्थांची आवर्जून मेजवानी दिली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -