घरलाईफस्टाईलMonsoon: पावसाळ्यात छत गळतेय, तर करा 'हा' उपाय

Monsoon: पावसाळ्यात छत गळतेय, तर करा ‘हा’ उपाय

Subscribe

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच पावसाळ्यामुळे घरात गारवा तर येतोच पण घर वॉटरप्रुफ करण्यासाठी सुद्धा काही ना काही केले जाते. अशातच जर घराचे छत गळत असेल तर आपण त्याखाली एखादे भांडे किंवा बादली आणून ठेवतो. ही समस्या प्रत्येक पावसाळ्यात उद्भवतेच. पण या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे याच संदर्भातील खास टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Water leaking from ceiling)

छत कोठून गळतंय हे पहा
छतावरुन पाणी गळत राहत असेल तर सर्वात प्रथम तुम्ही छताचा किती भाग गळतोय हे पहा. यामुळे भविष्यात होणाऱ्या लीकेजच्या समस्येपासून दूर राहता येईल. त्याचसोबत याच आधावर त्यावर योग्य तो उपाय करा. जर छताचा बहुतांश हिस्सा डॅमेज झाला असेल तर तो ठिक करण्यासाठी एक्सपर्टची मदत घ्यावी. पण लहान भाग खराब झाला असल्यास तो तुम्ही घरच्या घरी ही रिपेअर करु शकता.

- Advertisement -
Photo Credits-Google
Photo Credits-Google

रिपेअर पूर्वी करा हे काम
पाणी गळत असलेले छत व्यवस्थितीत करण्यासाठी ते बाहेरुनच नव्हे तर आतमधून सुद्धा व्यवस्थितीत करणे फार महत्वाचे असते. मात्र ओल्या ठिकाणी भेगा असतील त्यावर काहीही लावले तर ते टिकून राहत नाही. अशातच डॅमेज एरिया सुकवण्यासाठी तुम्ही पंख्याचा वापर करु शकता. सर्वात प्रथम सुक्या कपड्याने तो पुसून घ्या आणि नंतर पंखा सुरु करुन तो भाग सुकवून घ्या.

पोट्रेलने छताच्या भेगा बंद करा
सर्वसामान्यपणे छताच्या भेगा बंद करण्यासाठी सीमेंटचा वापर केला जातो. परंतु पेट्रोलच्या माध्यमातून ते अगदी सोप्पे होऊ शकते. यासाठी पेट्रोलमध्ये थर्माकोलचे तुकडे करुन ते मिक्स करा. असे केल्याने एक पेस्ट तयार होईल. आता छताचा डॅमेज एरियावर ही पेस्ट लावा. दोन-तीन तास सुकण्यासाठी छत तसेच ठेवा. यावेळी लहान मुलांना दूर ठेवा.

- Advertisement -

पेंट केल्याने ही सुधारू शकते स्थिती
जर भेगा लहान पडल्या असतील तर त्या बंद करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पेंट करु शकता. मात्र उत्तम परिणामासाठी तुम्ही पेट्रोलने तयार केलेली पेस्ट लावल्यानंतर डॅमेज एरिया पेंट करा. पेंट करताना काळजी घ्या की, ती पेस्ट पूर्णपणे सुकलेली असावी.


हेही वाचा- घरातील sink जाम झालयं मग ‘या’ ट्रिक्स वापरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -