घरलाईफस्टाईलयासाठी मारा दोरीच्या उड्या!

यासाठी मारा दोरीच्या उड्या!

Subscribe

वजन कमी करण्यासोबत यासाठीही फायदेशीर ठरतात 'दोरीच्या उड्या'

लहानपणीच्या खेळात दोरीच्या उड्या या सर्रास खेळल्या जातात. मात्र लहानपणी खेळत असलेल्या खेळाचा आता वर्कआउटमध्येही समावेश होत आहे. खेळ आणि फिटनेसशी निगडीत असणाऱ्या व्यक्ती आपल्या वर्कआउटमध्ये दोरींच्या उड्यांचा समावेश करत असतात. तसेच वजन कमी करण्यासोबतच इतर गोष्टींसाठी देखील दोरीच्या उड्या मारल्या जातात.

  • दहा मिनिटांसाठी दोरीच्या उड्या मारणं आठ मिनिटं धावण्यासमान असतं. त्यामुळे १० मिनिट दोरीच्या उड्या मारल्याने १० ते १६ कॅलरी ऊर्जा खर्च होते.
  • दोरीच्या उड्यांमुळे हाडं मजबुत होण्यास मदत होते.
  • दोरीच्या उड्या मारणं हे मेंदूसाठीही फायदेशीर ठरतं. दोरीच्या उड्या मारणं हा एक व्यायाम असून अर्ध्या तासापर्यंत दोरीच्या उड्या मारल्याने ५०० ग्रॅम वजन कमी होण्यास मदत होते.
  • दोरीच्या उड्यांमुळे शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. ज्यामुळे त्वचेला पोषण मिळण्यास सुरुवात होते आणि शरीरातील विषारी घटक घामाच्या स्वरुपात शरीरातून बाहेर टाकले जातात.
  • दोरीच्या उड्यांमुळे हार्मोन बॅलेन्स होण्यास मदत होते. ज्यामुळे टेन्सन आणि डिप्रेशनपासून सुटका होते.
  • दोरीच्या उड्यांमुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. फुफ्फुसं मजबुत होतात आणि चेहऱ्यावर चमक येते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -