घरदेश-विदेशआधारऐवजी पॅन नंबर दिल्यास 10 हजारांचा दंड

आधारऐवजी पॅन नंबर दिल्यास 10 हजारांचा दंड

Subscribe

आयकर परतावा भरताना खबरदारी घ्या

आयकर परतावा भरताना चुकून आधारच्या जागी पॅन नंबर टाकला, तर आयकर विभाग दहा हजार रुपये दंड आकारणार आहे. तसेच फॉर्म भरताना जितक्या वेळा चुका केल्या असतील तितक्या वेळा 10 हजार रुपयांप्रमाणे दंड भरावा लागणार आहे. जर एखाद्याने दहा चुका केल्या असतील, तर प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे 1 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. याकरता केंद्र सरकारने बजेट 2019 मध्ये आयकर अधिनियमच्या सेक्शन 272 बी मध्ये संशोधन केले आहे.

आयकर अधिनियमच्या सेक्शन 272 बी अनुसार कोणत्याही व्यक्तीला कलम 139 (5) (सी) अंतर्गत कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये पॅन किंवा आधार नंबर देणे आवश्यक आहे. जर अशावेळी चुकीचा पॅन किंवा आधार नंबर दिल्यास त्या व्यक्तीला आयकर विभागातील अधिकारी 10 हजार रुपये दंड लावू शकतो, या सेक्शनमध्ये प्रत्येक शब्द जोडला असल्याने जितक्या वेळी या चुका केल्या जातील तितक्या वेळी दंड वाढला जाणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे चुका टाळण्यासाठी खबरदारी घेणे आता महत्त्वाचे झाले आहे. आधार नंबर किंवा पॅन नंबरची माहिती देत असताना ती पुन्हा एकदा तपासून पाहणे गरजेचे बनले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -