घरमहाराष्ट्रमुंबईनंतर नवी मुंबईतही बोगस लसीकरणाचा पर्दाफाश

मुंबईनंतर नवी मुंबईतही बोगस लसीकरणाचा पर्दाफाश

Subscribe

मुंबईतील कांदिवली परिसरात बोगस लसीकरणाची बातमी समोर आल्यानंतर आता नवी मुंबईत बोगस लसीकरण करण्यात येत अल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कोरोनाचे संकट देशावर अद्याप कायम आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिग पाळणे,हात स्वच्छ धूणे,मास्क लावणे यासोबतच लसीकरण करणे देखील गरजेचे आहे. सध्या देशामध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद लसीकरणाला मिळत असल्याचे दिसतेय. परंतू याचदरम्यान बोगस लसीकरण करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात बोगस लसीकरणाची बातमी समोर आल्यानंतर आता नवी मुंबईत बोगस लसीकरण करण्यात येत अल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणाबाबत पोलिस तपास करत असून गुन्हा दाखल केला असल्याचे कळतेय. दरम्यान, हे लसीकरण ज्यांनी कांदिवलीत केले, त्याच्यावर संशय पोलिसांनी व्यक्त करण्यात आला(bogus vaccination in Navi Mumbai )
नवी मुंबईमधील शिरवणे एमआयडीसीतील एटोमबर्ग टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीतील 350 कर्मचाऱ्यांचे बोगस लसीकरण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी डॉ. मनिष त्रीपाठी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ त्रिपाठी याने याआधी मुंबईतील कांदिवली (Mumbai vaccination case) मध्ये अनेक लोकांना फसवून त्यांचे बोगस लसीकरण केले असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कांदिवली येथे गुन्हा दाखल केला होता. आता शिरवणे एमआयडीसीतील प्रकारानंतर तुर्भे पोलिसानी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक शंका तसेच प्रश्न निर्माण झाल्याने सरकार लोकांमध्ये लसीकरणासाठी जनजागृती करण्याचे काम करीत आहे. याचदरम्यान बोगस लसीकरणाच्या घटना समोर आल्याने नागरिकांच्या मनात पुन्हा असंतोष निर्माण होत आहे.



हे हि वाचा – पंढरपूरच्या दिशेने निघालेले बंडातात्या कराडकरांचे आंदोलन स्थगित

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -