घरमहाराष्ट्रप्लास्टिक पिशव्यांनी कचराकुंड्या भरल्या

प्लास्टिक पिशव्यांनी कचराकुंड्या भरल्या

Subscribe

कडक अंमलबजावणी झाल्याबरोबर नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत भय निर्माण झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी घरामध्ये प्लास्टिक पिशव्या नुसत्याच ठेवून कचरा वाढवण्याऐवजी त्या पिशव्या कचऱ्याच्या डब्यात टाकून घरातूनच प्लास्टिक हद्दपार करण्यास सुरुवात केली आहे.

प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी केल्यानंतर घराघरातून प्लास्टिक कचऱ्याच्या माध्यमातून हद्दपार होऊ लागले असून प्लास्टिक पिशव्यांनी कचराकुंड्या अक्षरशः भरल्या आहेत. अनेकांनी घरामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा केलेला होता. दैनंदिन वापरात येतात म्हणून घरोघरी या पिशव्या साठवलेल्या असतात. सलग दोन दिवस कडक अंमलबजावणी झाल्याबरोबर नागरिकांमध्ये या प्लास्टिक बंदीबाबत भय निर्माण झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी घरामध्ये प्लास्टिक पिशव्या नुसत्याच ठेवून कचरा वाढवण्याऐवजी त्या पिशव्या कचऱ्याच्या डब्यात टाकून घरातूनच प्लास्टिक हद्दपार करण्यास सुरुवात केली आहे. पुण्याच्या नवी सांगवी येथे प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्यामुळे कचरा कुंड्या भरगच्च भरल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या कंत्राटी कामगारांना या विषयी माहिती दिली होती. त्यांना दिवसातून दोनदा कचरा उचलण्यासाठी वारंवार विनंती केली गेली असल्याचे नागरिकांनी सांगितले. परंतु, कचरा एकच वेळ उचलला जात आहे. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

 

- Advertisement -
plastic bag garbage
प्लास्टिकचा कचरा

तातडीने प्लास्टिक पिशव्यांचे संकलन करा

ही समस्या काही दिवसांनी अधिक उग्र होणार आहे. अशा प्रकारे राज्यभरातून नागरिक प्लास्टिक पिशव्या रस्तोरस्ती आणून टाकतील, तर प्लास्टिक एकाच वेळी मोठे प्रदूषण होईल. सध्या पावसाळा सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचत असते. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांमध्ये गटारांमध्ये जर या पिशव्या गेल्या आणि गटारे तुंबली तर सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होण्यासाठीदेखील हा प्लास्टिक बंदीचा निर्णय कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे सगळीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांनी घराघरांतून प्लास्टिक पिशव्यांचे संकलन तातडीने करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

लाखोंची दंड वसुली

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ८ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आठ पथके तयार केली आहेत. यात ५० कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांनी शनिवारी धडक मोहीम राबवत १५ दुकानदारांवर कडक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण ७५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रविवारी १५०५ किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच ३ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -