घरमहाराष्ट्ररुग्णवाहिकेने ५ मिनिटांत कापले ५ किमी अंतर; तरिही वाचले नाही तरुणाचे प्राण

रुग्णवाहिकेने ५ मिनिटांत कापले ५ किमी अंतर; तरिही वाचले नाही तरुणाचे प्राण

Subscribe

रुग्णवाहिका चालकाने प्रयत्नांची शर्थ लावून अपघातग्रस्त तरुणाला पाच मिनिटांत रुग्णालयात दाखल केले, मात्र तरिही अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचले नाहीत.

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पिंपरी रेल्वे स्थानकाच्या जवळ घडली होती. प्रकाश दत्तराम नारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला वाचवण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने वाहतूक कोंडी मधून अवघ्या पाच मिनिटात ५ किलोमीटर अंतर कापत योग्य वेळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल, परंतु तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त झाली.

मयत प्रकाश दत्तराम नारे हा मुंबई मधील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. प्रकाश दिनांक (२० जानेवारी) रविवारी मुंबईहून पुण्यात काही कामानिमित्त आला होता. चिंचवड येथील चुलत भावाने त्याच्याशी रात्री उशिरा फोनवर बोलणे केले होते. ‘घरी जेवायला ये आणि भेटून जा’, असे चुलत भाऊ म्हटला होता. मात्र फार महत्त्वाचे काम असल्याने येत नसल्याचे प्रकाशने सांगितले. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्याने पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढले. पिंपरी रेल्वे स्थानकाच्या जवळ येताच त्याचा तोल गेला आणि प्रकाश धावत्या रेल्वेतून थेट खाली पडला.

- Advertisement -

रणजित हिरवे या रुग्णवाहिका चालकाला सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास अनोळखी इसम हा धावत्या रेल्वेतून पडला असून गंभीर जखमी झाला आहे, असा फोन रणजित यांना आला होता. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रकाशला इतर साथीदाराच्या मदतीने रुग्णवाहिकेत दाखल केले. प्रकाशला उपचाराची अत्यंत गरज होती, तो गंभीर जखमी होऊन अवघा रक्ताने माखलेला होता. प्रकाश शुद्धीवर असून तो श्वास घेत होत असल्याचे रणजित यांना जाणवले. रणजित यांनी वाहतूक कोंडीमधून पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या पाच मिनिटांत पार केले आणि प्रकाशला योग्य वेळेत रुग्णालयात दाखल केले, परंतु प्रकाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रणजित यांना यावर विश्वास बसत नव्हता. अखेर त्यांना सत्याला सामोरे जावे लागले. होय, प्रकाश वाचायला हवा होता. परंतु सर्व काही परमेश्वराच्या हातात असते तेच खरे. कारण रुग्णवाहिका चालक रणजित यांनी जखमी अवस्थेत असताना प्रकाशला काही मिनिटांत रुग्णालयात नेले होते. परंतु तिथून पुढे त्यांची मृत्यूशी झुंज शेवटची ठरली. रणजित यांनी अनेकांचे मृतदेह हे रुग्णालयात नेलेले आहेत. परंतु, पहिल्यांदाच कोणाला तरी वाचवण्याचे समाधान मिळणार होते, त्यातच त्या तरुणाचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -