घरमहाराष्ट्र...म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरहून परतले मुंबईत

…म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरहून परतले मुंबईत

Subscribe

 

मुंबईः नागपूर येथे मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे .गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या १० वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार नाहीत. हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. परिणामी मुख्यमंत्री शिंदे हे नागरपूरहून मुंबईत परतले असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -

राष्ट्रपती मुर्मू ह्या नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात गेले होते. मात्र रात्री मुख्यमंत्री शिंदे हे अचानक मुंबईत दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान, नागपूर येथे मुसळधार पाऊस होत असल्याने राष्ट्रपती मुर्मू यांचा नियोजित कार्यक्रम रद्द झाला आहे. त्या ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. याच कारणामुळे मुख्यमंत्री शिंदे मुंबईत परतल्याचे खात्रीलायकक सुत्रांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी ४ जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले. ५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे.

- Advertisement -

हेही वाचाःKarnataka Politics : कर्नाटकचाही होणार महाराष्ट्र, माजी मुख्यमंत्र्याचा दावा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्यपाल बनवारीलाल पुरोहित,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअर मार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदींनी स्वागत केले.

असा होता राष्ट्रपतींचा कार्यक्रम

४ जुलैच्या नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती ५ जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील.गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या १० वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतणार आहेत.त्याच दिवशी दुपारी भारतीय विद्या भवनतर्फे निर्माण करण्यात आलेल्या रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. नागपुरात मुसळधार पाऊस होत असल्याने राष्ट्रपती मुर्मू ह्या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असे सुत्रांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -