घरमहाराष्ट्रआंबेनळी घाटात कार दरीत कोसळली

आंबेनळी घाटात कार दरीत कोसळली

Subscribe

आंबेनळी घाटात पुन्हा अपघाताची घटना घडली आहे. कार ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतिही जिवितहानी झाली नाही

आंबेनळी घाटामध्ये आज सकाळी कार दरीमध्ये कोसळली. पोलादपूर तालुक्यातील दभळ गावाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र कारचा चालक जखमी झाला आहे. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुदैवाने जिवितहानी नाही

रायगड आणि सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटामध्ये ५० फूट खोल दरीमध्ये कार कोसळली. सकाळी अकराच्या दरम्यान दाभिळ गावाजवळ ही घटना घडली आहे. महाबळेश्वरकडे जाणारी कार थेट दरीत कोसळली. घटनास्थळावर महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांनी धाव घेतली. महाबळेश्वर ट्रेकर्सने जखमी चालकाला दरीतून वर आणले. त्यानंतर जखमी चालकाला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कारला बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

- Advertisement -

झाडाझुडपामुळे मोठी दुर्घटना टळली

आंबेनळी घाटातून महाबळेश्वरकडे जाणारी कार अचानक दरीत कोसळली. कारचालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. दरीमध्ये असलेल्या दाट झाडाझु़पांमुळे कार झाडामध्ये अडकली आणि मोठी दुर्घटना टळली.

बस दरीत कोसळली होती

आंबेनळी घाटामध्ये २८ जुलै २०१८ ला भीषण अपघात झाला होता. दापोली कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि कर्मचारी पिकनिकसाठी बसने महाबळेश्वरला जात होते. दरम्यान पोलादपूरातील आंबेनळी घाटातील ८०० फूट खोल दरीत त्यांची बस कोसळली होती. या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -