घरमहाराष्ट्रफडणवीस स्व. वसंतराव नाईक यांचा ११ वर्षांचा रेकॉर्ड मोडतील - चंद्रकांत पाटील

फडणवीस स्व. वसंतराव नाईक यांचा ११ वर्षांचा रेकॉर्ड मोडतील – चंद्रकांत पाटील

Subscribe

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने शंभरहून अधिक जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष बनला होता. २४ ऑक्टोबर रोजी निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार विधीमंडळात बैठकीसाठी जमले. भाजपच्या आमदारांनी भगवे फेटे बांधून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी ‘हमारा नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो’ अशा घोषणाही दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक संपन्न झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी अनुमोदन दिले.

फडणवीस यांच्या नावाची घोषणा करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “महाराष्ट्रात पुन्हा एकदा बिगर काँग्रेसी सरकार पुन्हा आल्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. स्व. वसंतराव नाईक यांचा ११ वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तोडतील. विधीमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांच्याशिवाय कुणाचेही नाव असू शकत नाही. राज्यातील प्रश्नांचे कितीही टेन्शन असले तरी ते चेहऱ्यावर कधीही दाखवत नाहीत, मागच्या पाच वर्षात राज्यात एकदाही गोळीबार झाला नाही, अनेक आंदोलने ही शांततेत पार पडली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा दुसरा कोणताही नेता पक्षनेतेपदी असू शकत नाही.”

- Advertisement -

अशी झाली देवेंद्र फडणवीस यांची निवड

चंद्रकांत पाटील यांच्या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार आणि हरिभाऊ बागडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगल प्रभात लोढा, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आशिष शेलार यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यानंतर केंद्रीय निरीक्षक नरेंद सिंग तोमर यांनी देवेंद्र फडणवीस यांनी निवड केली.


 

- Advertisement -
bjp mla in vidhan bhavan 1
पंकजा मुंडे यांच्यासमवेत भाजपच्या महिला आमदार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -