घरमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्तारासोबतच विखेंच्या भवितव्याबद्दल आज ठरणार?

मंत्रिमंडळ विस्तारासोबतच विखेंच्या भवितव्याबद्दल आज ठरणार?

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्लीत घेणार अमित शाहांची भेट

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपामध्ये अनेक हालचाली सुरू असून, मंत्रीमंडळ विस्तार, राधाकृष्ण विखे यांचा पक्ष प्रवेश कधी करायचा या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते. या अगोदर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतली होती.

दरम्यान यावेळी शिवसेना भाजप जागावाटप आणि सेनेकडून नव्याने मागणी करण्यात आलेल्या लोकसभा उपाध्यक्ष पद या मुद्यांवर देखील चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस संध्याकाळी दिल्लीला पोहचणार असून, आज रात्री ते अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ताडदेव मिल कंपाऊंड एसआरए प्रकरणी ताशेरे ओढले असून विरोधकांनी मेहता यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. या मुद्यावरही शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -