घरमहाराष्ट्रधनंजय मुंडेंबाबत संभ्रम कायम

धनंजय मुंडेंबाबत संभ्रम कायम

Subscribe

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार हे मुंबईतल्या हॉटेल रेनिसाँसमध्ये थांबलेले असून शिवसेनेचे अनुभवी नेते त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात आहेत. भाजपने ऑपरेशन लोटस सुरु केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालीय. आमदारांना एकत्र ठेवण्याच मोठे आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झाले. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे वारंवार त्या हॉटेलमध्ये जाऊन आमदारांशी चर्चा करत असून त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न करताहेत. पण यात चर्चा होतेय ती ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांची. मुंडे हेही याच हॉटेलमध्ये असून त्यांनी अजुन उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू समजले जातात. अजित पवारांनी शपथ घेण्याच्या आधीपासून मुंडे हेही नॉट रिचेबल होते. त्यामुळे त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. नंतर तेही राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसोबत तेही बसने हॉटेलवर आले. मात्र त्यांच्याबद्दलचा संभ्रम कायम आहे. आमदारांशी बोलायला आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आता पुढे आलीय.

- Advertisement -

या भेटीत दोनही नेत्यांनी मुंडे यांचं मन वळविण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. कारण मुंडे हे पहिल्यापासूनच शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्यास इच्छुक नव्हते. त्यापेक्षा राष्ट्रवादीने भाजपसोबत मिळून सरकार बनवावे,असे त्यांचे मत होते हे आता पुढे येत आहे. त्यामुळे मुंडे यांच्या मनात काय चालले आहे हेही या नेत्यांनी जाणून घेतले आहे. आता सभागृहात मुंडे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये.
– धनंजय मुंडे, नेते राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -