घरमहाराष्ट्रसाळावमधील कन्व्हेअर बेल्ट कोसळण्याचा धोका!

साळावमधील कन्व्हेअर बेल्ट कोसळण्याचा धोका!

Subscribe

येथील पूल आधीच धोकादायक स्थितीत असताना आता या पुलाला लागून असलेला साळावस्थित जेएसडब्ल्यू कंपनीचा कन्व्हेअर बेल्टही धोकादायक स्थितीमध्ये असल्याने परिसरातील नागरिक आणि या रस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवासी चिंताग्रस्त झाले आहेत.

अलिबाग-मुरुड रस्त्यावरील रेवदंडा पुलापलीकडे जेएसडब्ल्यूचा कन्व्हेअर बेल्ट सध्या अतीशय धोकादायक स्थितीत आहे. या बेल्टच्या माध्यमातून बंदरातील कच्चा माल कारखान्यात नेला जातो. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख मार्गावरून हा कन्व्हेअर बेल्ट जातो. अलिबाग येथील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाला याबाबत काहीच कल्पना नसल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisement -

याबाबत मेरीटाइम बोर्डाचे येथील बंदर निरीक्षक अमर पालवणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा विषय गेल्या काही वर्षांचा असल्यामुळे याबाबत काही माहिती नाही. सदर कन्व्हेअर बेल्टबाबत आमच्या विभागात काही माहिती अलिबाग येथील जिल्हा कार्यालयाकडून मागविली आहे. ती माहिती आल्यानंतरच नेमका अंदाज येणार आहे. पूल आमच्या विभागात असला तरी त्या पुलावरून गेलेल्या कन्व्हेअर बेल्टसाठी जे फाउंडेशन टाकण्यात आले आहे ती जागा मुरुड तालुक्यातील आहे.

ज्यावेळी कन्व्हेअर बेल्ट उभारला गेला त्यावेळी मुरुड हा महाड विभागात होता. त्यावेळी त्यांच्याकडून परवानगी घेतली की नाही, हे मला माहीत नाही. पाच ते सहा वर्षांपासून मुरुड तालुका अलिबाग विभागात आला आहे. आपल्याला येथे येऊन अडीच वर्षे झाली असल्याने याबाबत काही माहिती नसल्याची माहिती अलिबाग उप विभागाचे कनिष्ठ अभियंता राहुल बागूल यांनी दिली. दरम्यान, इस्पातमधील संबंधित अधिकार्‍यांची या संदर्भात प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -