घरमहाराष्ट्र'त्या' आरोपींनी दिली आणखी एका गुन्ह्याची कबुली

‘त्या’ आरोपींनी दिली आणखी एका गुन्ह्याची कबुली

Subscribe

दोन्ही आरोपींना १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अकोला पारस फाट्याजवळील ट्रक ड्राइवर खून प्रकरणातील आरोपीं कडून गुन्ह्यातील मुद्देमाल व शस्र जप्त करण्यात बाळापूर पोलिसांना यश आले आहे. दरम्यान याच घटनेतील आरोपींनी आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. ५ डिसेंबर चे रात्री दरम्यान पारस फाट्या जवळील जम्मू च्या धाब्यावर उभ्या असलेल्या ट्रक च्या ड्राइवर ला चोरीच्या उद्देशाने आलेल्या लुटारूनी चाकूने केलेल्या मारहाणीत ट्रक ड्राइवर विजयसिंग रॉय जगदीप रॉय हा मरण पावला होता. यामध्ये ६ ते ७ आरोपी सहभागी होते. त्यापैकी आरोपी संतोष बागी भोसले, नागार्जुन अरविंद भोसले रा.अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती यांना अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले होते. दोन्ही आरोपींना तपास अधिकारी बाळापूरचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी न्यायालयात हजर करून १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

बाळापूर पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास केला असता पोलिसांना समजलं की, १० मे २०१८ रोजी शेगाव टी पॉईंटजवळील पठाण पेट्रोल पंपजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकमधील ट्रक ड्राइवर व क्लिनर यांना चाकूने मारहाण करण्यात आली होती. तसंच दोन्ही मृतांचे १० हजार रुपये आणि मोबाइईल घेऊन हे आरोपी पळून गेल्याची सुद्धा कबुली सदर चोरट्याने दिली. यावरून बाळापूर पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांचे पथकाने अंजनगाव सुर्जी येथे जाऊन आरोपींकडून २ सुरे आणि २ मोबाइल जप्त केले. नमूद आरोपी हे आणखी काही गुन्ह्यात सामील आहेत का याबाबत बाळापूर पोलिस तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -