घरमहाराष्ट्रविन्हेरे गावात लहान बालकांवर कुत्र्याचा हल्ला

विन्हेरे गावात लहान बालकांवर कुत्र्याचा हल्ला

Subscribe

 महाड ट्रामा केअरमध्ये दाखल

तालुक्यातील विन्हेरे गावात घरासमोर खेळत असलेल्या तीन लहान बालकांवर पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यामुळे त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याच गावातील एक वृद्ध व्यक्ती आणि एका महिलेलादेखील कुत्र्याने चावा घेतला आहे. या सर्व जखमींना विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर महाड ट्रामा केअर सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून काही दिवसांपूर्वी दासगाव येथे भटक्या कुत्र्याने काहीजणांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच विन्हेरे येथे सोमवारी सकाळी घरासमोर खेळणार्‍या लहान बालकांवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये अवघ्या दीड वर्षाच्या श्रीअंश बांगर या बालकाच्या चेहर्‍याचे लचके तोडले आहेत. तर विवील विसापूरकर (8), श्रावणी आंजर्लेकर (9) यांच्या हाताला आणि पायाला चावा घेतला. याचबरोबर विन्हेरे येथील रामचंद्र कदम(60), सनिली कटीमली (34) या दोघांनाही या कुत्र्याने जखमी केले आहे. या सर्वांवर महाड ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

- Advertisement -

या बालकांना खोल जखमा झाल्या असल्याने त्यांना अँटी रेबीज सिरम देणे गरजेचे असल्याचे डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले. मात्र अँटी रेबीज सिरम महाडमध्ये कोणत्याच शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसल्याने अलिबाग येथून मागवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -