घरमहाराष्ट्रपुणे- मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारी 'डेक्कन क्वीन' झाली ९२ वर्षाची

पुणे- मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारी ‘डेक्कन क्वीन’ झाली ९२ वर्षाची

Subscribe

वाढदिवस साजरा करण्याची ६७ वर्षांची परंपरा

पुणे- मुंबईकरांना जून १९३० पासून अहोरात्र सेवा देणाऱ्या दख्खनच्या राणीने अर्थात डेक्कन क्वीनने नुकतेच ९२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेली अनेक वर्षे मुंबई-पुणेकरांच्या प्रवासाचा अविभाज्य घटक म्हणून डेक्कन क्वीनकडे पाहिले जाते. पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी १ जून १९३० रोजी डेक्कन क्वीनची सेवा सुरु करण्यात आली.

दख्खनची राणी पूर्वी दोन शहरांमध्ये धाव

ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीने पहिली लक्झरिअस रेल्वे सेवा म्हणून पुणे- मुंबई मार्गावर डेक्कन क्वीनची सेवा सुरु केली होती. ब्रिटिश साम्राज्याच्या काळात डेक्कन क्वीनची सुरुवात झाली. या गाडीचा प्रामुख्याने उपयोग घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांना मुंबई -पुणे असा प्रवास करण्यासाठी होत होता. परंतु त्यानंतर हळहळू तिच्या सेवेचा विस्तार वाढवण्यात आला. त्यानंतर दख्खनची राणी दोन शहरांमध्ये धावू लागली. ह्या गाडीचा पहिला प्रवास कल्याण ते पुणे असा होता. आज महाराजा एक्स्प्रेस, डेक्कन ओडिसा, पॅलेस ऑन व्हील्स यांसारख्या महागड्या आणि अनोख्या ‘डायनिंग कार’मध्ये डेक्कन क्वीनचे नाव गणले जाते. त्यामुळे इंटसिटी गाड्यांपेक्षा डेक्कन क्वीनला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

१ जूनला डेक्कन क्वीनचा बर्थ डे सेलिब्रेशन 

दरवर्षी १ जूनला ही गाडी मुंबईला रवाना होण्याआधी रेल्वे प्रवासी ग्रुप आणि पुणे-मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या दिमाखात केक कापत डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला जातो. तसेच या डेक्कन क्वीनला बाहेर आणि आतल्या बाजूस आकर्षक फुले आणि इतर सजावटीच्या वस्तू वापरून आकर्षक केले जाते.

 आज ही गाडी वाढदिवशी धावणार नाही

मात्र गेल्या वर्षी कोरोना संकटात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे पुणे स्थानकात डेक्कन क्वीनचा प्रतिकात्मक वाढदिवस साजरा झाला. त्याचप्रमाणे यंदाही कोरोना संसर्ग वाढतच असल्याने लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यामुळे यंदाही डेक्कन क्लीनचा वाढदिवस प्रतिकात्मक पद्धतीने साजरा केला जाणार आहे.

- Advertisement -

वाढदिवस साजरा करण्याची ६७ वर्षांची परंपरा

रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्षा हर्षा शहा यांचे काका शांतिलाल शहा व्यवसायिक कामानिमित्त डेक्कन क्वीनने गेली वर्षानोवर्षे प्रवास करत आहे. यातच १९५४ साली त्यांनी पहिल्यांदा डेक्कन क्लीनचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी हर्षा शहा यांचे वय केवळ पाच वर्षे होते. तेव्हापासून दरवर्षी त्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. काकांच्या निधनानंतर हर्षा शहा यांनी डेक्कन क्वीनचा वाढदिवस स्वत: साजरा करण्याची परंपरा सुरू ठेवली. हर्षा शहा यांच्याकडून यंदा डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्याचे हे ६७ वे वर्षे आहे.

सर्वोत्कृष्ट ‘डायनिंग कार’ सुविधा

प्रशस्त जागा, वेगवान प्रवास, आरामदायी कोचमुळे डेक्कन क्वीनला विशेष ओळख मिळू लागली. १९३० पासून ते आत्तापर्यंत डेक्कन क्वीनबद्दल असंख्य लोकांच्या मनात घर करुन आहे. सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा मिळालेल्या डेक्कन क्वीनचा थाट खऱ्या अर्थाने राजेशाही आहे. आज जवळपास ९२ वर्षे ही डेक्कन क्लीन प्रवाशांना प्रदीर्घ काळ सेवा देत आहे. डेक्कन क्वीनचे खरे वैशिष्ट्ये म्हणजे या गाडीत सर्वोत्कृष्ट डायनिंग कारची सुविधा आहे. ती भारतातील अन्य कोणत्याही रेल्वे गाडीत उपलब्ध नाही. हॉटेलप्रमाणे प्रशस्त किचन व त्याच ठिकाणी बसून खाण्याची सोय अशी डायनिंग कारची रचना आहे. या डायनिंग कारमध्ये ३२ खुर्चा आहेत. मुंबई – पुण्यातील अनेक प्रवासी या डायनिंग कारमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी ताटकाळत उभे राहतात. आकर्षक रचनेमुळे ही डेक्कन क्वीन डायनिंग कार म्हणून नावारुपास आली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -