घरमहाराष्ट्रएका प्लास्टिक पिशवीमुळे उमेदवाराला ५ हजारांचा भुर्दंड

एका प्लास्टिक पिशवीमुळे उमेदवाराला ५ हजारांचा भुर्दंड

Subscribe

उमेदवारीअर्ज भरताना लागणारी रक्कम प्लास्टिक पिशवीतून आणल्याने उमेदवाराला दंड

महाराष्ट्रात २३ जून २०१८ पासून पूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्यात आली. त्यानंतर देखील प्लास्टिकचा वापर काही भागात होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारीअर्ज भरताना लागणारी रक्कम प्लास्टिक पिशवीतून आणल्याने सोमवारी एका अपक्ष उमेदवाराला दंड भरावा लागला. नेवासे विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारीचे नाव मच्छिंद्र देवराम मुंगसे असे असून ते नेवासे तालुक्यातील देडगाव येथे राहणारे आहेत.


हेही वाचा- गोराईमध्ये बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश

नेमकं काय घडलं?

सोमवारी दुपारच्या वेळात नेवासे विधानसभा मतदारसंघातून मुंगसे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांसह तेथील तहशील कार्यालयात गेले होते. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांकडे रक्कम देण्याकरिता १० हजार रूपयांचे सुट्टे पैसे आणले होते. त्यावेळी १ हजार रूपयांचीच चिल्लर स्वीकारली जाईल असे सांगितले. मात्र, मुंगसे यांनी सुट्टे पैसे घेण्याचा आग्रह धरत वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी नेवासी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी समीर शेख तेथे उपस्थितीत होते. मुंगसे यांनी प्लास्टिक पिशवीतून आणलेली १० हजार रूपयांची चिल्लर त्यांच्या समोर ठेवली. बंदी असलेल्या प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याने मुंगसे यांना पाच हजारांचा दंड केला.


संपादकीय – प्लास्टिक बंदी : घोषणा आणि फियास्को!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -