घरमहाराष्ट्रपुण्यात गटारी फियास्को ! स्लग - १२ नामांकित हॉटेल, पबवर छापे

पुण्यात गटारी फियास्को ! स्लग – १२ नामांकित हॉटेल, पबवर छापे

Subscribe

रविवारपासून श्रावण सुरू होणार म्हणून श्रावण महिना पाळणारे मद्यपी आणि मांसाहारी यांच्यासाठी शनिवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे साहजिक मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमधील हॉटेल्स, क्लब शनिवारी रात्रभर नेहमीच्या तुलनेत अधिक भरले होते. मात्र पुण्यात गटारी साजरी करणार्‍यांचा चांगलाच फियास्को झालो.

रविवारपासून श्रावण सुरू होणार म्हणून श्रावण महिना पाळणारे मद्यपी आणि मांसाहारी यांच्यासाठी शनिवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे साहजिक मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमधील हॉटेल्स, क्लब शनिवारी रात्रभर नेहमीच्या तुलनेत अधिक भरले होते. मात्र पुण्यात गटारी साजरी करणार्‍यांचा चांगलाच फियास्को झालो. मध्यरात्री पुणे पोलिसांनी शहरातील १२ नामांकीत हॉटेल्सवर छापे टाकले, ज्यांमध्ये सुमारे ६ ते ७ हजार तरुण-तरुणी होत्या. मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

रात्री-बेरात्री सुरू असलेल्या तरुणाईच्या धिंगाण्याला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल १२ नामांकित पंचतारांकित हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर यांच्यावर शनिवारी रात्री कारवाई केली. मध्यरात्री एक वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. यावेळी हॉटेल्सवर गुन्हेही दाखल करण्यात आले.गेल्या काही दिवसांत मध्यरात्रीनंतर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पब्सचे, क्लब्सचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे स्थानिकांना खूप त्रासही होतो. याबाबत अनेक तक्रारीही पोलिसांकडे आल्या होत्या.

- Advertisement -

याच तक्रारींची दखल घेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट अंतर्गत मॅक्लारेन पब, डेली ऑल डे, द बार स्टॉक,मियामी, जे डब्ल्यू मेरियेट हॉटेल चतुश्रुंगी, नाईट रायडर, नाईट स्काय, वेस्टइन, पेन्टहाऊस, हार्डरॉक, ओकवूड लाऊन्ज आणि ब्ल्यू शॅकवर कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. यातील बरेचसे हॉटेल्स हे पुण्यात प्रसिद्ध आहेत. जेव्हा कारवाई झाली तेव्हा या हॉटेलांमध्ये ६-७ हजार तरूण तरूणी उपस्थित होते. अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे, भागूप्रताप बर्गे तसेच ६ पोलीस निरीक्षक, ६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४० पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -