घरमहाराष्ट्रगिरीश महाजन तुम्ही येऊ नका, तुमच्याने काही होणार नाही; अण्णा संतापले

गिरीश महाजन तुम्ही येऊ नका, तुमच्याने काही होणार नाही; अण्णा संतापले

Subscribe

गिरीश महाजन यांना भेटण्यास अण्णांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी गिरीष महाजन यांना फोन करुन येऊ नका असे सांगितले. त्यामुळे मुंबईवरुन राळेगणसिध्दीकडे निघालेल्या गिरीश महाजन यांनी त्यांचा दौरा रद्द करावा लागला.

लोकपाल कायद्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक पुन्हा एकदा आंदोलनासाठी बसले आहेत. संत यादवबाबा मंदिरात १० वाजता अण्णांनी उपोषणाला सुरुवात केली. अण्णांनी उपोषण करु नये यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नेहमीप्रमाणे मध्यस्थी करण्यासाठी जाणार होते. मात्र अण्णा हजारे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी आपला दौरा रद्द केला आहे. “गिरीश महाजन मला भेटायला येणार असल्याचे कळले होते, मात्र त्यांनी भेटून काही उपयोग नाही. कारण त्यांच्या हातात काहीच नाही.”, अशी प्रतिक्रिया अण्णांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.

महाजनांचा दौरा रद्द 

अण्णा हजारे यांनी महात्मा गांधीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. अण्णांच्या उपोषणाच्या पार्श्वभुमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धी येथे जाणार होते. मात्र गिरीश महाजन यांना भेटण्यास अण्णांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी गिरीश महाजन यांना फोन करुन येऊ नका असे सांगितले. त्यामुळे मुंबईवरुन राळेगणसिध्दीकडे निघालेल्या गिरीश महाजन यांनी त्यांचा दौरा रद्द केला. अण्णांची समजूत काढण्यासाठी निघालेल्या महाजन यांचा हिरमोड झाला.

- Advertisement -

अण्णांनी उपोषण मागे घ्यावे 

लोकपालला जोपर्यंत नियुक्त केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार अण्णांनी घेतला आहे. अण्णा हजारे यांनी गिरीश महाजन यांना फोन करु येऊ नका असे सांगितले. ‘तुमच्या येण्याने काही फरक पडणार नाही. उगाच जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल. मंत्री आले आता काही तडजोड होईल आणि उपोषण करण्यापासून ते थांबतील. मात्र असे काही करु नका उपोषण करणारचं. तुमच्याकडून काही होणार नाही कारण तुमचा बॉस दिल्लीत बसला आहे.’ असे अण्णा हजारे यांनी महाजनांना सांगितले. दरम्यान, गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना अण्णांनी उपोषण मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. लोकायुक्ताच्या नियुक्तीसाठी सरकारकडून प्रयत्न सुरु असल्याचे महाजनानांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -