घरमहाराष्ट्रगोवा-मुंबई खासगी बसला कोल्हापुरात भीषण अपघात; पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

गोवा-मुंबई खासगी बसला कोल्हापुरात भीषण अपघात; पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

कोल्हापूर : गोवा-मुंबई खाजगी ट्रॅव्हल्स बसला पुण्याकडे जात असताना कोल्हापुरातील राधानगरी परिसरात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांपैकी 16 जण सुखरुप आहेत. गेल्या महिन्याभरात कोल्हापुरात बस अपघाताची ही दुसरी घटना आहे. (Goa Mumbai private bus crashes in Kolhapur Unfortunate death of three from the same family in Pune)

गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या व्ही.आर.एल. कंपनीच्या खाजगी स्लीपर बसला कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड येथील पुईखडी येथे मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला. बसमधून 25 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास खाजगी बस राधानगरी येथील पुईखडी वळणावर आली असता चालकाचं बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघाताची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – प्रश्नांची उत्तरं न दिल्यामुळे बाईंनी केली शिक्षा अन् चिमुकला जीवानिशी गेला; काय आहे प्रकरण?

गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या व्ही.आर.एल. कंपनीच्या खाजगी स्लीपर बसला कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड येथील पुईखडी येथे मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला. बसमधून 25 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास खाजगी बस राधानगरी येथील पुईखडी वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. अपघाताची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले.

- Advertisement -

मध्यरात्र असल्याने बसमधील सर्व 25 प्रवासी गाढ झोपेत. मात्र चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुईखडी येथे बस उलटली आणि या अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नीलू गौतम (43), रिधिमा गौतम (14), सार्थक गौतम (13) अशी मृतकांची नावे आहेत. तर बसखाली अडकलेल्या चार प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्यानंतर सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या सध्या उपचार सुरू असून बसमधील 16 प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा – CII survey : प्राप्तिकर परतावा देण्याची गती वाढली, करप्रणाली झाली अधिक सुलभ

कोल्हापुरात महिनाभरातील दुसरी घटना

गेल्या महिनाभरातील कोल्हापुरातील खाजगी बस अपघाताची ही दुसरी घटना आहे. गोव्याहून मुंबईकडे कऱ्हाडमार्गे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला 9 नोव्हेंबर रोजी पुलावरून कोसळून अपघात झाला होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात असलेल्या वारणा नदीवरील कोकरूड येथे घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसचे किरकोळ नुकसान झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -