घरमहाराष्ट्रहरऽ हरऽऽ महादेवच्या जयघोषात गजबजले भीमाशंकर

हरऽ हरऽऽ महादेवच्या जयघोषात गजबजले भीमाशंकर

Subscribe

श्रावणामधील पहिल्या सोमवारी भल्या पहाटे दोन ते तीन लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. श्रावणातील पहिल्या दिवसापासूनच भीमा शंकराच्या दर्शनाकरता भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. आता पर्यंत दीड लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेत हरऽ हरऽऽ महादेवच्या जयघोषात भीमाशंकर गजबजून गेले.

पुणे जिल्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. या ठिकाणी भाविकांनी हरऽ हरऽऽ महादेवच्या जयघोषात रविवार पासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रावणामधील आजच्या पहिल्या सोमवारी भल्या पहाटे पासून सुमारे दोन ते तीन लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. एसटी बस स्थानकापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दीड लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारी भरपावसात, दाट धुक्‍यामधील जंगलवस्ती ‘भीमाशंकर महाराज की जय’ अशा जयघोषात सुमारे दीड लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेत आपली यात्रा पूर्ण केली. यावर्षी श्रावणातील पहिल्या दिवसापासूनच भीमाशंकराच्या दर्शनाकरता भाविकांची गर्दी होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी श्रावणात संपूर्ण महिनाभरापासून देवस्थान आणि प्रशासन यांच्याकडून नियोजन सुरु होते.

- Advertisement -

पोलीस बंदोबस्त तैनात

भिमाशंकर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून काटेकोरपणे काळजी घेण्यात आली आहे. मंदिराजवळ आणि पायऱ्यांच्या सुरवातीला अशी विविध अत्याधुनिक शस्त्र घेऊन पोलिस, श्वान पथक, बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आले आहेत. तर वाढती गर्दी लक्षात घेता १३ पोलिस अधिकारी, १३९ पोलिस कर्मचारी, २३ महिला कर्मचारी, ३२ वाहतूक पोलिस, खेड होमगार्ड पथकातील २० कर्मचारी कार्यरत आहेत. तर अनेक ठिकाणी टेहळणी पथके ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर जंगल रस्त्यात सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी नियंत्रण कक्ष देखील उभारण्यात आले आहे. तर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिर परिसरात अग्निशामक बंब, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका देखील ठेवण्यात आले आहे.

भाविकांकरता एसटी महामंडळाच्या जादा गाड्या

भाविकांकरता एसटी महामंडळाकडून ६० जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तर पार्किंगपासून एसटी स्थानकाकडे भाविकांना ने-आण करण्यासाठी सहा मिनीबसची देखील सोय करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -